Page Nav

HIDE

Breaking News:

latest

सोनाक्षीने केला 'दबंग ३' मधील 'रज्जो' चा फर्स्ट लूक शेअर

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने आपल्या दबंग  3  चे शुटिंग सुरू केले आहे. नुकतेच त्याच्या शुटिंगचे काही फोटो सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. यानंत...

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने आपल्या दबंग 3 चे शुटिंग सुरू केले आहे. नुकतेच त्याच्या शुटिंगचे काही फोटो सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. यानंतर आता चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा देखील आपला चित्रपटातील फर्स्ट लूक आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सोनाक्षीने आपला हा लूक शेअर करताना असे लिहीले की, 'रज्जो पुन्हा येणार आहे. दबंगपासून दबंग 3 पर्यंत.. माझ्या शुटिंगचा पहिला दिवस आहे. मला शुभेच्छा द्या..सोनाक्षीच्या लूकमध्ये फारसा बदल झालेला दिसत नाही. मागील दोन चित्रपटात ती जशी दिसत होती तशीच दिसणार आहे. सोनाक्षी तिच्या मागील दोन चित्रपटांप्रमाणे या फोटोमध्ये अधिक सुंदर दिसत आहे.
या सोनाक्षीच्या फर्स्ट लूकमध्ये ती साईड पोज देताना दिसत आहे. यामध्ये ती गुलाबी रंगाचे ब्लाऊज आणि पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. केसामध्ये साडीला साजसं गुलाबी रंगाचे फुल माळले आहे. मागील दोन दबंगच्या सिरीजमध्ये सोनाक्षी तशीच दिसली आहे. सोनाक्षीने या चित्रपटात रज्जो नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. 2010 मध्ये सोनाक्षीने दंबगमधूनच बॉलिवूड विश्वात एन्ट्री केली होती.

No comments