Page Nav

HIDE

Breaking News:

latest

'हे' बॉलिवूड सेलिब्रिटी भारतात मतदान करु शकत नाही! काय आहे या मागील कारण ?

2019  लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. दरवर्षी निवडणुकीत केवळ सामान्य लोकंच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटीही उत्साहात बघा...

2019 लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. दरवर्षी निवडणुकीत केवळ सामान्य लोकंच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटीही उत्साहात बघायला मिळतात. बॉलिवूड सेलिब्रिटीही भारतीय नागरिकांना मतदान करण्याचे आवाहनही करतात. मात्र यातील काही कलाकार असेही आहेत जे लोकसभा निवडणुकीत मतदान करु शकणार नाहीत. यात बॉलिवूडच्या टॉपच्या कलाकारांचा समावेश आहे.

1) अक्षय कुमार
बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार याने अनेक चित्रपटातून देशप्रेम दाखविले आहे. तसेच अक्षय कुमारचा जन्म पंजाबच्या अमृतसरमध्ये झाला होता. मात्र अधिकृतपणे तो भारताचा नागरिक नाहीये. अक्षय कुमारकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे. भारतीय नियमानुसारतुम्ही दोन देशांचं नागरीकत्व ठेवू शकत नाहीतत्यामुळे अक्षय कुमार भारतात मतदान करु शकणार नाही.

2) आलिया भट्ट
फार कमी वेळात बॉलिवूडची सध्याची टॉपची अभिनेत्री बनलेली आलिया भट्ट ही भारतात मतदान करु शकणार नाही. कारण आलिया भट्टची आई सोनी राजदान या ब्रिटीश नागरिक आहेत. आणि आलियाकडेही ब्रिटीश पासपोर्ट आहे.

3) दीपिका पादुकोण
बॉलिवूडची सर्वात जास्त लोकप्रिय असलेली आणि सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री दीपिका सुद्धा या यादीत आहे. तिचे वडील जरी भारतीय असले तरी दीपिकाचा जन्म डेनमार्कच्या कोपनहेगनमध्ये झाला होता. तिच्याकडे डॅनिश पासपोर्ट आहे.

4) जॅकलीन फर्नांडिस
लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या जॅकलीनचा जन्म बहरैनच्या मनाममध्ये झाला होता. तिचे वडील श्रीलंकेचे तर आई मलेशियाचे नागरिक आहेत.  2006 मध्ये मिस यूनिव्हर्स श्रीलंका स्पर्धा जिंकल्यावर जॅकलीनने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं.

5) कतरिना कैफ
अभिनेत्री कतरिना कैफचे वडील कश्मीरी आहेत. पण कतरिनाचा जन्म हॉंगकॉंगमध्ये झाला होता आणि तिच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट आहे. त्यामुळे इच्छा असूनही ती भारतात मतदान करु शकत नाही.

Information Source: Wikipedia

No comments