Page Nav

HIDE

Breaking News:

latest

रिंकुचा कागर या चित्रपटाचा धमाकेदार टीजर प्रदर्शित

सैराट या सुपरहिट चित्रपटातून पदार्पण करणारी रिंकू राजगुरूचा बहुप्रतिक्षित चित्रपट कागरचा टीजर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रिंकूची प्रमु...

सैराट या सुपरहिट चित्रपटातून पदार्पण करणारी रिंकू राजगुरूचा बहुप्रतिक्षित चित्रपट कागरचा टीजर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रिंकूची प्रमुख भुमिका असून शुभांकर तावडेही असणार आहे. चित्रपटा प्रेमकथा आणि राजकारणावर आधारित असल्याचे टीजरवरून दिसत आहे.

मराठी सिनेसृष्टीत सैराट चित्रपटाने घातलेला धुमाकुळ तुम्हाला माहितीच असेल पण याच चित्रपटाने सिनेसृष्टीला रिंकु राजगुरु नावाची एक अभिनेत्री दिली. रिंकु राजगुरु आता कागर या चित्रपटाच्या माध्यमातून तुमच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. अवघ्या काही तासांमध्ये हा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिंकूचे राजकारणात प्रवेश करण्यापूर्वीचे आयुष्य आणि त्यानंतरच्या बदलाची छोटीशी झलक 1 मिनिट 21 सेकंदांच्या या टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. प्रियकरावर अतोनात प्रेम करणारी रिंकू त्याला राजकारणात कसे वागावे त्याचे धडे देतानाही दिसत आहे.

'कागरया चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी केले आहे. तर सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या 'उदाहरणार्थया संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे. याआधी हा चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र रिंकूची 12 वीची परीक्षा असल्यामुळे चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट आता 26 एप्रिलला प्रदर्शित होत आहे.

No comments