Page Nav

HIDE

Breaking News:

latest

उन्हाळ्यामध्ये प्रदूषणापासून त्वचेला सुरक्षित ठेवण्याचे काही उपाय.!!

पर्यावरणीय प्रदूषण आणि हवेतला विषारीपणा याचा आपल्या त्वचेवर आणि तिच्या वृद्ध होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. प्रदूषण हे आपल्या त्वचे...

पर्यावरणीय प्रदूषण आणि हवेतला विषारीपणा याचा आपल्या त्वचेवर आणि तिच्या वृद्ध होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. प्रदूषण हे आपल्या त्वचेला हानी पोहोचवणारे एक मोठे कारण आहे.

प्रदूषणाचा त्वचेवर परिणाम कसा होतो:
प्रदूषणामुळे कोलॅजनच्या उत्पादनात घट होतेअतिरिक्त पिगमेंटेशनवेळेआधी येणाऱ्या सुरकुत्यारुक्षपणागजकर्ण होतो आणि त्वचेची संवेदनशीलता वाढते. हवेतल्या प्रदूषण करणाऱ्या घटकांमुळे फ्री रॅडिकल्स तयार होतात जे आपल्या डीएनए वर हल्ला चढवतातत्वचा पातळ आणि रुक्ष बनवतात आणि त्यामुळे त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो. सिगारेटच्या धुरासारख्या इतर प्रदूषकांमुळे त्वचेखालच्या रक्तप्रवाहावर विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे सुरकुत्या पडतात.

प्रदूषण फक्त तुमच्या त्वचेवर एक थर तयार करत नाही तर ते तुमच्या त्वचेच्या छिद्रांमध्ये प्रवेश करू शकते कारण प्रदूषणाचे कण त्वचेवरील छिद्रांपेक्षा बरेच लहान असतात. प्रदूषणापासून होणारी त्वचेची हानी टाळण्यासाठी त्वचेची काळजी घेणं आणि एक नित्यक्रम पाळणं महत्त्वाचं आहे.

1. स्वच्छ करा:
हमाम सारख्या सुरक्षा पुरवणाऱ्या साबणाने तुमच्या सर्व शरीरावरची त्वचा स्वच्छ केल्याने त्वचेमध्ये दिवसभर साठलेले फ्री रॅडिकल्स आणि धूळ नष्ट होईल. कडुनिंबकोरफड आणि तुळस यासारख्या घटकांमुळे त्वचा सुरक्षित आणि आर्द्र राहते. सुरक्षा पुरवणाऱ्या क्लीन्जर्स सह आपल्या शरीरावरून प्रदूषण रोजच्या रोज धुवून टाकणं महत्त्वाचं आहे.

2. मॉइश्चराइझ करा:
चांगल्या प्रकारे स्वच्छता केल्यावर त्वचेवर मॉइश्चरायझरच्या साह्यानं एक अटकाव निर्माण करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्वचा लवचिक ठेवण्यासाठी अशी स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरा ज्यामध्ये हायड्रेटिंग एजंट्स असतील आणि त्यामुळे त्वचेवर एक मजबूत अटकाव निर्माण होईल. एका चांगल्या मॉइश्चरायझरमुळे त्वचेला पुन्हा आर्द्रता प्राप्त होते आणि त्यामुळे त्वचेची लवचिकता आणि कोलॅजनचं उत्पादन वाढतं. व्हिटॅमिन ए असणाऱ्या मॉइश्चरायझर्समुळे प्रदूषणामुळे होणाऱ्या अकाली वृद्धत्वाशी सामना केला जाऊ शकतो. व्हिटॅमिन सी असलेल्या सीरम्समुळे प्रदूषणाच्या परिणामांच्या विरोधात मदत होते.

3. अँटीऑक्सिडंट्सचा वापर करा:
अँटीऑक्सिडंट्स त्वचेवर लावल्याने किंवा त्याचा आहारात समावेश केल्याने त्याचा त्वचेवर चांगला परिणाम होतो. अँटीऑक्सिडंट्समुळे फ्री रॅडिकलची क्रिया थांबते. त्वचेसाठी व्हिटॅमिन सी आणि ई हे सर्वोत्तम अँटीऑक्सिडंट्स आहेत. असे घटक असलेली सीरम्स रात्री आणि दिवसाही लावा. त्वचेची काळजी घेण्याची बात येते तेव्हा संत्रीपालक आणि बदाम यासारखी फळं आणि भाज्या अत्यंत प्रभावी ठरतात. जर तुम्हाला आहारातून पुरेसं व्हिटॅमिन सी मिळत नसेल तर दरररोज मलटीव्हीटॅमिन घ्या.
  
4. सुरक्षित ठेवा:
दररोज सनस्क्रीन लावा कारण सूर्यप्रकाशामुळे होणारी हानी थाबंवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही बाहेर सूर्यप्रकाशात असाल तेव्हा स्कार्फ आणि हॅट्स वापरून शक्य तितकी त्वचा झाकून घ्या.

5. उपचार करा:
वायू प्रदूषणाचे हानिकारक परिणाम कमी करण्यासाठी आठवड्यातून एकदा फेस मास्क हा तुमच्या त्वचेसाठी चांगला उपचार ठरू शकतो. काही काळाने नष्ट होणारी त्वचेची आर्द्रतापपईकडुनिंबकोरफडमध हे घटक असलेल्या घरी बनवलेल्या मास्कच्या साह्याने पुन्हा मिळवली जाऊ शकते.

6. धूम्रपान सोडा:
सिगारेटचा धूर हा फ्री रॅडिकलचा एक मोठा स्रोत आहे जो त्वचेला हानी पोहोचवून सुरकुत्या निर्माण करू शकतो. ही सवय आजच सोडून द्या!
  
7. शरीर आर्द्र ठेवा:
प्रदूषणाच्या हानिकारक परिणामांपासून त्वचेला सुरक्षित ठेवण्यासाठी करता येण्यासारखी सर्वोत्तम गोष्ट म्हणजे शरीर आर्द्र ठेवणं. भरपूर पाणी आणि ग्रीन टी प्यायल्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि त्वचेची लवचिकता वाढते.

या टिप्सचा वापर करा आणि मग प्रदूषणाच्या तुमच्या त्वचेवरील हानिकारक परिणामांशी तुम्ही लढू शकाल. वृद्धत्व ही स्वाभाविक प्रक्रिया आहे पण काही विशेष उपाय करून अकाली वृद्धत्व टाळता येऊ शकते.

No comments