Page Nav

HIDE

Breaking News:

latest

सुपरहिट झाले दीपिकाने रिजेक्ट केलेले 'हे' 5 चित्रपट

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण ही प्रत्येक चित्रपट चोखंदळपणे निवडते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. दीपिकाचा पद्मावत हा चित्रपट  ...

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण ही प्रत्येक चित्रपट चोखंदळपणे निवडते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. दीपिकाचा पद्मावत हा चित्रपट 300 कोटींची कमाई करून गेला. त्यामुळे तिला बॉलिवूडची राणी म्हटले जाऊ लागले. परंतु अनेकवेळा एखादा चित्रपट सोडल्यानंतर तो बॉक्स ऑफिसवर हिट झाला की मग पश्चाताप करण्याची वेळ येते. दीपिकाने देखील असेच काही चित्रपट वेगवेगळ्या कारणांना सोडले परंतु बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांनी कोट्यवधींचा गल्ला जमवला. दीपिकाने रिजेक्ट केलेले पाच चित्रपट सुपरहिट झाले. 
पाहुया कोणते आहे हे चित्रपट

1.) Jab Tak Hai Jaan
2012 मध्ये आलेला शाहरूखचा हा चित्रपट सुपरहिट राहिला. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेसाठी कतरिना आधी दीपिकाच्या नावाची चर्चा होती. परंतु दीपिकाने हा चित्रपट करण्यास नकार दिला. त्यानंतर कतरिनाची निवड करण्यात आली. दीपिकाने शाहरूखसोबत ओम शांती ओमचेन्नई एक्सप्रेस आणि हॅपी न्यू ईयर हे चित्रपट केले आहेत. जर तिने जब तक है जानमध्ये भूमिका स्वीकारली असती तर ही संख्या चारवर गेली असती.

2.) Dhoom 3
आमिर खानअभिषेक बच्चन यांचा धूम सिरीजमधील या चित्रपटासाठी दीपिकाचे नाव चर्चेत होते. परंतु तिने नकार दिल्यावर कतरिनाची वर्णी लागली. हा चित्रपट देखील सुपरहिट ठरला.

3.) Kick
सलमान खानची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटासाठी दीपिकाची निवड करण्यात आली होती. परंतु व्यस्त चित्रिकरणामुळे तिला हे शक्य झाले आणि तिने आपले नाव माघारी घेतले. हा चित्रपटही सुपरहिट राहिला.

4.) Prem Ratan Dhan Payo
या चित्रपटासाठी देखील दीपिकाची निवड होणार होती. पंरतु व्यस्त शेड्यूलमुळे तिला माघार घ्यावी लागली आणि नंतर हा चित्रपट सोनम कपूरकडे गेला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने देखील चांगली कमाई केली. दीपिकाची दुसऱ्यांदा सलमानसोबत काम करण्याची संधी गेली.

5.) Sultan
कुस्तीवर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रग्गड कमाई केली. सलमान खान आणि अनुष्काची जोडी अनेकांच्या पसंतीत उतरली. अनुष्काच्या भूमिकेसाठी निर्मात्यांची पहिली पसंत दीपिका होती. परंतु तिने ही भूमिका करण्यास नकार दिला. दीपिकाने तिसऱ्यांदा सलमानसोबतचा चित्रपट नाकारल्याने बॉलिवूडमध्ये तिला सलमानचा विरोधक मानले जाऊ लागले आहे.

No comments