Page Nav

HIDE

Breaking News:

latest

Simmba Box Office Collection | 'सिंबा' ने 10 दिवसांत केली एवढ्या करोडाची कमाई

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा नुकताच प्रदर्शित झालेला ' सिम्बा ' हा चित्रपट ' गोलमाल ' प्रमाणे ' सिंघम ' फ्रँचाईझी पुढे ...

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा नुकताच प्रदर्शित झालेला 'सिम्बा' हा चित्रपट 'गोलमाल' प्रमाणे 'सिंघम' फ्रँचाईझी पुढे नेण्याचा हा शेट्टी फॉर्म्युला हिट ठरला असून अवघ्या दोन आठवड्यात शेट्टी स्टाईल मनोरंजन, जबरदस्त कलाकार असलेल्या 'सिम्बा'ने बॉक्स ऑफीसवर 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. सिम्बाने भारतात आतापर्यंत तब्बल 173.15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्याचबरोबर भारताबाहेरील कमाई लक्षात घेता 200 कोटी रुपयांचा आकडा 'सिम्बा'ने पार केला असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिली आहे.
रणवीर सिंगचा 'सिम्बा'च्या धडाकेबाज कामगिरीमुळे हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. त्याच्या 'बाजीराव मस्तानी'ने याआधी तिकीटबारीवर जोरदार कमाई केली होती. शुक्रवारी 9.02 कोटी आणि शनिवारी 13.32 कोटी रुपये मिळून 'सिम्बा'ची एकूण कमाई 173.15 कोटी रुपये एवढी झाली आहे. फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरही 'सिम्बा'ने चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने विदेशात आठ दिवसांत 63.22 कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारत आणि भारताबाहेरच्या एकूण कमाईने 200 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.

हा सिनेमा रेकॉर्ड रचत आहे. 'सिंबा' 2018 ची तिसरी सर्वात जास्त कलेक्शन करणारा सिनेमा ठरला आहे. संजूने बॉक्स ऑफिसवर 341 करोडपद्मावतने 300 करोड रुपयांचा बिझनेस केला आहे. करण जोहरच्या प्रोडक्शनमध्ये बनलेली 'सिंबा' ही हिट फिल्म ठरली आहे.

No comments