Page Nav

HIDE

Breaking News:

latest

Munna Bhai 3: मुन्ना-सर्किट ची जोडी पुन्हा येणार प्रेक्षकांचा भेटीला

राजकुमार हिराणी आणि अभिजात जोशी यांचा  ' मुन्नाभाई  3'  चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यामुळे आता चाहत्यांना पुन्हा ...

राजकुमार हिराणी आणि अभिजात जोशी यांचा 'मुन्नाभाई 3' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यामुळे आता चाहत्यांना पुन्हा मुन्नाभाईची जादुची झप्पी अनुभवायला मिळणार आहे.

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 'मुन्नाभाई एमबीबीएसआणि 'लगे रहो मुन्नाभाईया चित्रपटांना मिळालेल्या यशानंतर आता त्याचा तिसरा भाग येणार आहे. यासंदर्भातील माहिती अभिनेता अर्शद वारसीने दिली आहे. 'मुन्नाभाई-3’ 'च्या शूटिंगला या वर्षाच्या मध्यापर्यंत किंवा अखेरपर्यंत सुरुवात होणार असल्याचे त्याने सांगितले.

राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'मुन्नाभाई एमबीबीएस' ( 2003) आणि 'लगे रहो मुन्नाभाई' (2006) या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. या चित्रपटानंतर 'मुन्नाभाई ३'साठी जवळपास 10 वर्षांहून अधिक काळ लागला. पहिल्या दोन चित्रपटांप्रमाणेच संजय दत्त आणि अर्शद हे मुन्नाभाई व अर्शद सर्कीटच्या भूमिकेत असेल.

चित्रपटाच्या पटकथेवर सध्या काम सुरू आहे. त्यामुळे जून किंवा वर्षाअखेरीस शूटिंगला सुरुवात होईल,' असं अर्शदने सांगितलं. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना मुन्नाभाई आणि सर्कीटची धमाल जोडी पाहायला मिळणार हे नक्की.

No comments