Page Nav

HIDE

Breaking News:

latest

रणवीरच्या ‘Gully Boy’ मध्ये ही मराठी अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत

रणवीर सिंग ,  आलिया भट्ट यांचा  ‘Gully Boy’     चित्रपट या वर्षांत प्रदर्शित होत आहे. झोपडपट्टीत लहानचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नासाठी ध...

रणवीर सिंगआलिया भट्ट यांचा ‘Gully Boy’  चित्रपट या वर्षांत प्रदर्शित होत आहे. झोपडपट्टीत लहानचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नासाठी धडपडणाऱ्या एका रॅपरची ही गोष्ट आहे. 26 वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा ‘Gully Boy’ मध्ये पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटात मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाषही पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. अमृतानं सोशल मीडिया पोस्टद्वारे या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत काम करण्यास खूप मज्जा आली असं अमृतानं पोस्टमध्ये म्हटलं आहे.  या चित्रपटाच्या निमित्तानं अमृता पहिल्यांदाच रणवीर सिंगसोबत काम करत आहे. या चित्रपटातील तिची बहुतेक दृश्य ही रणवीर सोबत चित्रीत करण्यात आली आहेत. ‘Gully Boy’ चं बरचंस चित्रिकरण हे धारावीमध्ये करण्यात आलं आहे.


त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा खूपच वेगळा होता असंही अमृता म्हणाली.  ‘Gully Boy’ हा चित्रपट येत्या व्हॅलेंटाइन डे ला म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. झोया अख्तर या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे.


No comments