Page Nav

HIDE

Breaking News:

latest

Gully Boy Trailer: 'गली बॉय' चा अफलातून ट्रेलर प्रदर्शित

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेला  ' गली बॉय '  चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. काही दिवसांपासून या चित्रपट...

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेला 'गली बॉयचित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. काही दिवसांपासून या चित्रपटातील कलाकारांचे खास लूक प्रदर्शित होण्यास सुरुवात झाली आहे. अशात आता चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या 'गली बॉय' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मुंबईच्या गल्लीबोळातील एक वेगळं जग आणि त्या जगात वावरणाऱ्या अशा कलाकाराचा प्रवास या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटाच्या अवघ्या अडीच मिनिटांच्या ट्रेलमधून चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याची झलक पाहायला मिळत आहे.

रॅप कसं करतात इथपासून सुरुवात होऊन पुढचा प्रवास करत जागतिक स्तरावर आपली ओळख प्रस्थापित करणाऱ्या रॅपरच्या स्वप्नांना या चित्रपटाच्या निमित्ताने नवी झेप मिळाली आहे असं म्हणावं लागेल. मुंबईमध्ये कलाकारांचा एक असा वर्ग आहेज्या वर्गाची कला अनेकदा दुर्लक्षित राहतेपण गेल्या काही वर्षांमध्ये याच कलेला मिळणारा प्रतिसाद पाहता रॅप प्रकारातील गाण्यांची दुनिया नेमकी आहे तरी कशी हे 'गली बॉय' मधून पाहता येणार आहे.

रणवीरसोबतच अभिनेत्री आलिया भट्ट आणि इतरही कलाकारांचा अभिनय पाहता 'गली बॉय' रुपेरी पडद्यावर चांगलाच डंका वाजवणार अशीच प्रतिक्रिया चाहत्यांनी देण्यास सुरुवात केली आहे. रितेश सिधवानीस फरहान अख्तर यांची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटातून रॅपर विवियन फर्नांडिस (डिवाईन) आणि नावेद शेख (नॅझी) यांच्या हिप-हॉप आर्टीस्ट होण्यापर्यंतच्या प्रवासावर भाष्य करण्यात आलं आहे. १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

No comments