Page Nav

HIDE

Breaking News:

latest

Censor Board बाळासाहेब ठाकरे यांच्या समोर लहान: संजय राऊत

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित  ' ठाकरे '   चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवसेनेचे खासदार स...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकतंच या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं. या लॉन्चिंग दरम्यान संजय राऊत यांनी सेन्सॉरची कात्रीही बाळासाहेबांसमोर लहान असल्याचे म्हटले आहे.

चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनावेळी यातील काही दृश्य आणि संवांदावर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतला होता. त्यामुळेसीबीएफसीकडून चित्रपटाला प्रमाणपत्र मिळण्याबाबत प्रश्न विचारला असता राऊत यांनी असे उत्तर दिले. यासोबतच तुम्हाला कोणी सांगितलं की सीबीएफसीला चित्रपटावर आक्षेप आहेअसा सवालही त्यांनी केला. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला सीबीएफसीकडून प्रमाणपत्रदेखील मिळालं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

चित्रपटात प्रत्येक ती गोष्ट आहे जे पाहण्याची प्रेक्षकांना इच्छा आहे. सेन्सॉरची कात्रीदेखील बाळासाहेबांसमोर लहान आहे. ते स्वतःच दुसऱ्यांवर नियंत्रण ठेवतअसेही राऊत यावेळी म्हणाले. 'ठाकरेचित्रपट हिंदी आणि मराठी भाषेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २५ जानेवारीला हा चित्रपट मराठीत प्रदर्शित होणार आहे.

Thackeray is an upcoming bilingual biographical film written and directed by Abhijit Panse, made simultaneously in Marathi and Hindi. Following the life of Bal Thackeray, the founder of the Indian political party Shiv Sena, the film stars Nawazuddin Siddiqui as the eponymous person and Amrita Rao as his wife. The film scheduled for release on 25 January 2019, the 93rd birthday of Bal Thackeray.

No comments