Page Nav

HIDE

Breaking News:

latest

लवकरच कपिल शर्माच्या शोमध्ये सुनील ग्रोवर परतणार?

नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात कॉमेडी किंग कपिल शर्मा यशस्वी ठरला आहे. पण सुनील ग्रोवरसोबत काही महिन्यांपूर्वी झालेल्या वादानंतर कपिल ...

नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात कॉमेडी किंग कपिल शर्मा यशस्वी ठरला आहे. पण सुनील ग्रोवरसोबत काही महिन्यांपूर्वी झालेल्या वादानंतर कपिल प्रचंड डिप्रेशनमध्ये होता. दरम्यान त्याचा हा कॉमेडी शोदेखील बंद पडला. पण कपिल काही दिवसांपूर्वीच पुन्हा याच शोसोबत पडद्यावर परतला आणि यशस्वी ठरला.

तर दुसरीकडे सुनील ग्रोवरचा कानपूरवाले खुराणा शो बंद पडण्याच्या मार्गावर असल्यामुळेलवकरच कपिल शर्माच्या शोमध्ये सुनील ग्रोवर परतणार असल्याची शक्यता एका माध्यमाने वर्तवली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसारगेल्या काही दिवसांपासून सुनील 'भारत'च्या चित्रीकरणात व्यस्त होता. त्याने चित्रीकरणातून वेळ मिळताच मधला वेळ कानपूरवाले खुराणासाठी दिला. पण तो आता पुन्हा 'भारत'च्या चित्रीकरणासाठी परतणार असून हे चित्रीकरण पूर्ण होताच सुनील कपिल शर्मा शोमध्ये येणार असल्याचे म्हटले जात आहे.

'भारतचित्रपटाच्या शूटिंगदरम्यान माझ्याकडे महिनाभराचा वेळ होता. त्यामुळे हा वेळ मी सत्कारणी लावला,' असं त्याने म्हटलं होतं. सुनीलसाठी माझ्या शोचे दार नेहमीच खुले असल्याचं कपिलने आधीच स्पष्ट केलं होतं.

No comments