Page Nav

HIDE

Breaking News:

latest

या चित्रपटात ऑनस्क्रीन पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार दीपिका-रणवीर?

' राम-लीला ' ,  ' बाजीराव-मस्तानी '   आणि  ' पद्मावत '   या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये झळकलेले दीपिका पदुकोण आणि अभिन...

'राम-लीला''बाजीराव-मस्तानी' आणि 'पद्मावत' या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये झळकलेले दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर या दोन्ही कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वीच दीपिका आणि रणवीरने लग्नगाठ बांधत खऱ्या आयुष्यातही एकमेकांना कायमची साथ देण्याची वचनं दिली.

'टाईम्स ऑफ इंडिया' ने सूत्रांचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसारमाजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकत साकारल्या जाणाऱ्या चित्रपटात दीपिकाची वर्णी लागू शकते. रणवीर या चित्रपटामध्ये कपिल देव यांची भूमिका साकारत असूनकपिल देव यांच्या म्हणजेच रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारण्याची संधी दीपिकाला मिळू शकण्याची चिन्हं आहेत.

कबीर खान दिग्दर्शित चित्रपट '83' मध्ये रोमी भाटीयाम्हणजेच कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेसाठी दीपिकाच्या नावाला पसंती देण्यात आली असूनलवकरच यासंबंधी चित्रपट निर्माते भेट घेणार असल्याचं कळत आहे. त्यामुळे खऱ्या आयुष्यात पती- पत्नी असणारी ही लोकप्रिय जोडी रुपेरी पडद्यावरचे पती पत्नी साकारत पुन्हा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार काहे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

25 जून 1983 ही तारीख भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये कोरली गेली. भारतीय संघाने लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर क्रिकेट विश्वचषक जिंकल्यामुळे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 1983 च्या क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित '83' हा चित्रपट येणार आहे. रणवीर सिंह हा या चित्रपटात तत्कालीन कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत असणार आहे. तर दीपिकाला कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले असल्याचे वृत्त 'डेक्कन क्रॉनिकल'ने दिले आहे. या भूमिकेला दीपिकाने अद्याप होकार दिला की नाही हे गुलदस्त्यातच आहे.

No comments