Page Nav

HIDE

Breaking News:

latest

विवेक ऑबेरॉयचा 'पीएम नरेंद्र मोदी' बायोपिकचा फर्स्ट लुक प्रदर्शित

बॉलिवूडमध्ये  सध्या राजकीय नेत्यांच्या जीवन प्रवास बायोपिकच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे. यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ...

बॉलिवूडमध्ये सध्या राजकीय नेत्यांच्या जीवन प्रवास बायोपिकच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे. यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंगशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बायोपिक येत आहे. या सिनेमाचे पहिल्या पोस्टरचे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. 'पीएम नरेंद्र मोदी' असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय हा प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 'पीएम नरेंद्र मोदीया चित्रपटाचा पोस्टर लाँच करण्यात आला असून या पोस्टरवर मोदींच्या पोशाखात उभा असलेला विवेक ओबरॉय हुबेहूब मोदींप्रमाणे दिसत असल्याने या चित्रपटाबाबत उत्कंठा आणखीनच वाढीस लागत आहे.
या बायोपिकच्या दिग्दर्शनाची धुरा ओमंग कुमार बी. यांनी सांभाळली असून विवेके ओबरॉय आणि संदीप सिंग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ओमंग कुमारने या पूर्वी देखील बायोपिक्सच्या दिग्दर्शनाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पडली असून त्याने मेरी कॉम चित्रपटाचे देखील दिग्दर्शन केले होते. दरम्यान आज 'पीएम नरेंद्र मोदीसिनेमाचं पोस्टर 23 भाषांमध्ये रिलीज करण्यात आल आहे.

No comments