Page Nav

HIDE

Breaking News:

latest

महानायक अमिताभ बच्चन सोबत स्क्रिन शेअर करणार 'आर्ची' अन् 'परशा'

' आर्ची '  आणि  ' परशा '   म्हणजेच आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू ही जोडी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या  ' सैराट '  म...

'आर्चीआणि 'परशा' म्हणजेच आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू ही जोडी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'सैराटमुळे खुप लोकप्रिय झाले. चाहत्यांना या चित्रपटानंतर या दोघांनी पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची उत्सुकता होती. हे दोघेही आता नागराज मंजुळेंच्याच 'झुंडचित्रपटात झळकणार आहेत. आता या दोघांच्याही बॉलिवूड पदार्पणाचीही चर्चा आहे.

'झुंड' चित्रपटाची मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. यात महानायक अमिताभ बच्चन हे देखील भूमिका साकारणार आहे. त्यांनी चाहत्यांशी या चित्रपटाचे अनेक अपडेट्सही शेअर केले आहेत. आकाश आणि रिंकू देखील आता यात एकत्र झळकणार असल्याने या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन हे झोपडपट्टीतील तरुणांना फूटबॉल प्रशिक्षण देणाऱ्या विजय बारसे यांची भूमिका साकारत आहेत. तर रिंकू आणि आकाश या संस्थेतील फूटबॉलपटूंच्या भूमिकेत आहेत.

सैराटनंतर रिंकू राजगुरुची भूमिका असलेला 'कागरहा दुसरा लवकरच प्रदर्शित होणार आहे. सैराट चित्रपटानंतर आकाश ठोसर महेश माजरेकरांच्या 'फ्रेण्डशिप अनलिमिटेडआणि 'लस्ट स्टोरीज' या वेबसीरिजमध्ये राधिका आपटेसोबत झळकला होता.

No comments