Page Nav

HIDE

Breaking News:

latest

अभिनेता वरुन धवन अडकणार नताशा सोबत लग्नाच्या बेडीत

2018  हे वर्ष बॉलिवूडसाठी लगीसराईचे ठरले  सोनम कपूर-आनंद अहुजा ,  प्रियांका चोप्रा-निक जोनास आणि दीपिका पादुकोण-रणवीर सिंग  हे सेलिब्रेटी या...

2018 हे वर्ष बॉलिवूडसाठी लगीसराईचे ठरले सोनम कपूर-आनंद अहुजाप्रियांका चोप्रा-निक जोनास आणि दीपिका पादुकोण-रणवीर सिंग हे सेलिब्रेटी या गतवर्षी विवाहबंधनात अडकले. पण आता यावर्षी कोणत्या सेलिब्रेटींच्या घरी लग्नाचे सनई-चौघडे वाजणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

आता अभिनेता वरुन धवनही लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. वरुण त्याची बालपणीची मैत्रीण नताशा दलालसोबत नोव्हेंबरमध्ये लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे. नताशाच्या कुटुंबीयांनी नोव्हेंबर 2019 मध्ये या दोघांच्या लग्नाची तारीख ठरवली असून वरुणच्या कुटुंबीयांचीही त्याला काही हरकत नसल्याचं समजतं. एवढेच नाही तर दोन्ही घरच्यांनी लग्नाच्या तयारीला सुरुवातही केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

वरुण धवन आणि नताशा दलाल बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. सुरुवातील दोघांनीही हे नाते सर्वांपासून लपवले होते. पण अखेर दोघांचं गुपित बाहेर आल्यानं त्यांना सर्वांसमोर त्यांच्या नात्याची कबुली द्यावी लागलीय. त्यांचे प्रेमसंबंध जगजाहीर झाल्यानंतर दोघे अनेक ठिकाणी एकत्र फिरताना दिसले. याबाबत वरुणकडून अजून कोणतेच अधिकृत वक्तव्य आलेले नाही मात्र तो लवकरच आपल्या लग्नाची तारीख चाहत्यांसोबत शेअर करण्याची शक्यता आहे.

No comments