Page Nav

HIDE

Breaking News:

latest

अमृता सिंगच्या नकारामुळे नाही करत कार्तिकला मेसेज, साराचा ने खुलासा

सारा अली खान  हिने बॉलिवूडमध्ये दमदार एंट्री केली आहे. 2018 मध्ये रिलीज झालेल्या साराच्या दोन्ही चित्रपटांनी चांगली कमाई केली आहे. त्यातच कर...

सारा अली खान हिने बॉलिवूडमध्ये दमदार एंट्री केली आहे. 2018 मध्ये रिलीज झालेल्या साराच्या दोन्ही चित्रपटांनी चांगली कमाई केली आहे. त्यातच करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये कार्तिक आर्यनचे नाव घेतल्यानंतर सारा आणखीनच चर्चेत आली आहे.

अभिनेत्री सारा अली खान हिने काही दिवसांपूर्वीच कॉफी विथ करणच्या एका भागात हजेरी लावली होती. यावेळी ती सैफसोबत या शोमध्ये उपस्थित होती. शोमध्ये करण जोहरने तुला कोणाला डेट करायला आवडेलअसा प्रश्न विचारला असता साराने कार्तिक आर्यनचे नाव घेतले. यानंतर सारा आणि कार्तिकला वारंवार अनेक कार्यक्रमांत याबद्दल प्रश्न विचारले गेले.

असाच एक प्रश्न साराला नुकतंच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आला. कार्तिकने जर तुला डेटसाठी विचारलंतर तु काय करशीलअसा सवाल तिला केला गेला. यावर साराने क्षणाचाही विलंब न करता होमी त्याच्यासोबत लगेचच कॉफी किंवा मुव्हीसाठी जाईल आणि हा माझ्यासाठी खूप मोठा आश्चर्याचा धक्का असेलअसे म्हटले. यासोबतच कार्तिकला इन्स्टाग्रामवर मेसेज न करण्याचे कारणही तिने सांगितले. आपली आई अमृता सिंगने त्याला मेसेज न करण्यास सांगितले असल्याचे तिने म्हटले आहे. कारण काही दिवस त्याच्या मेसेजची वाट पाहण्याचा सल्ला अमृताने दिल्याचे साराने सांगितले. 

No comments