Page Nav

HIDE

Breaking News:

latest

शाहरुख खानच्या या चित्रपटात दिसणार फातिमा सना शेख!!

शाहरुख खानसाठी  गतवर्ष निराशाजनक ठरले. त्याचा गतवर्षी रिलीज झालेला  ‘ झिरो ’   दणकून आपटला. त्यापूर्वी आलेले फॅन ,  रईस आणि दिलवाले आणि जब ह...

शाहरुख खानसाठी गतवर्ष निराशाजनक ठरले. त्याचा गतवर्षी रिलीज झालेला झिरो दणकून आपटला. त्यापूर्वी आलेले फॅनरईस आणि दिलवाले आणि जब हॅरी मेट सेजल हे त्याचे सगळे सिनेमे आपटले. शाहरुखचा जब हॅरी मेट सेजल या चित्रपटाचा बजेट 90 कोटी रुपये इतका होता. पण बॉक्स आॅफीसवर चित्रपटाने केवळ 64.33 कोटी रुपये कमावले. फॅनरईस आणि दिलवाले या चित्रपटांची गतही फार वेगळी नव्हती. त्यामुळे झिरो’ शाहरुखसाठी महत्त्वाचा आहे. पण हा चित्रपटही फ्लॉप झाला. पण या अपयशामुळे हार मानेल तो किंगखान कुठलाशाहरूखने आता आपल्या नव्या चित्रपटाची तयारी सुरु केली आहे.

या चित्रपटाचे नाव आहे सॅल्यूट’. या चित्रपटाचे शूटींग यावर्षी मे महिन्यात सुरु होणार होते. पण काही कारणास्तव येत्या फेबु्रवारीपासूनचं याचे शूटींग सुरू करण्याचा निर्णय किंगखानने ने घेतला आहे. या चित्रपटात करिना कपूर शाहरुखची हिरोईन असणारअसे मानले गेले होते. पण आता एक ताजी बातमी आहे. होयचित्रपटाचे निर्माता करिनाऐवजी फातिमा सना शेखला कास्ट करू इच्छितातअसे कळतेय.

आधी सॅल्यूट आमिर खानला आॅफर झाला होता. पण आमिरने यात काम करण्यास नकार दिल्यावर यासाठी शाहरूखला साईन करण्यात आले. अलीकडे शाहरूखने यासाठी आमिरचे आभारही मानले होते. आमिरचे आभारत्याच्यामुळे मला इतका चांगला चित्रपट मिळालाअसे शाहरूख म्हणाला होता. कदाचित फातिमालाही सॅल्यूट’ मिळवून देण्यामागेही आमिरचाच हात असावा.

No comments