Page Nav

HIDE

Breaking News:

latest

रणवीर म्हणातोय, अपना टाईम आयेगा... | बघा 'गली बॉय' चित्रपटाचा टीझर

अभिनेता रणवीर सिंग  याचा सिंबा हा चित्रपट गाजत असतानाच आता त्याच्या आगामी  'गली बॉय ' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटा...

अभिनेता रणवीर सिंग याचा सिंबा हा चित्रपट गाजत असतानाच आता त्याच्या आगामी 'गली बॉय' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात रणवीर एका झोपडपट्टीत तरुणाची भूमिका करत आहे. यात रणवीर एक रॅपर दाखवला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट व कल्की कोएचलिन या दोन अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत.

झोया अख्तर यांचे दिग्दर्शन असलेला 'गली बॉयचित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वीच सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले गेले. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

'वक्त हमारा है....', असं म्हणत अनेकजण आपल्या स्वप्नांचा पाठलाग करतात आणि ती पूर्ण करण्याच्या दिशेने पावलं उचलतात. अभिनेता रणवीर सिंग सध्या अशाच एका कलाकाराचा प्रवास त्याच्या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. 'गली बॉयया चित्रपटात रणवीर एका रॅपरच्या भूमिकेत झळकत असूनझोया अख्तर या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यापूर्वी त्यातील एक रॅप साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गाण्याचा व्हिडिओ म्हणजे या चित्रपटाचा टीझर आहेअसंच म्हणावं लागेल. 'असली हिप हॉप...', अशा शीर्षकाच्या या गीतात रणवीरचा रॅपर लूक सर्वांच्या भेटीला येतो. त्यासोबतच आलिया आणि त्याच्या भूमिका नेमक्या कशा असतील याविषयीसुद्धा माहिती मिळते.

मुंबईतील एका लहान वस्तीत राहणारा मुलगा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अडीअडचणींवर मात करत कशा प्रकारे साऱ्या जगात आपल्या कलेच्या बळावर लोकप्रियता मिळवतो याचा संघर्षपूर्ण प्रवास या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 9 जानेवारी रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आता त्याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

No comments