Page Nav

HIDE

Breaking News:

latest

जाणून घ्या कमी वयात केस पांढरे होण्याची कारणे..! हे टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

केस पांढरे  होणे हा पूर्वी वाढत्या वयाचा परिणाम समजला जायचा. आता मात्र तसे राहिलेले नाही. बऱ्याच जणांच्या केसांमध्ये वयाच्या विशीत किंवा त्य...

केस पांढरे होणे हा पूर्वी वाढत्या वयाचा परिणाम समजला जायचा. आता मात्र तसे राहिलेले नाही. बऱ्याच जणांच्या केसांमध्ये वयाच्या विशीत किंवा त्याहीपूर्वी रूपेरी छटा दिसू लागतात. केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येला तोंड देणाऱ्यांची संख्या भारतातही वाढत आहे.

केसांना मेलानिन नावाच्या रंगद्रव्यामुळे रंग मिळतो. तुमच्या केसातील मेलानिनची पातळी जेवढी अधिकतेवढे तुमचे केस काळे (किंवा गडद रंगाचे) असतात. वाढत्या वयासोबत मेलानिनची पातळी खालावणे सामान्य आहे पण अलीकडे हे खूप लवकर घडू लागले आहे

केस पांढरे होण्यामागील कारणे:
आनुवंशिक कारणे:
बऱ्याचदाकेस पिकण्याची प्रक्रिया गुणसूत्रांशी निगडित असते. म्हणजे तुम्ही याचे खापर तुमच्या आई-वडिलांवर किंवा पूर्वजांवर फोडू शकता! केस अकाली पांढरे होण्याचे कारण आनुवंशिकता/जनुकीय असते तेव्हा त्याबद्दल फारसे काही करता येत नाही. ते होतातच.

कमतरता:
झिंककॉपरब जीवनसत्व यांच्या कमतरतेमुळे केस अकाली पिकू (पांढरे होऊ) शकतात. समतोल आहार आणि सप्लिमेंट्स घेतल्यास हे टाळण्यात खरोखर मदत होईल. तुमच्या आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा सढळ हाताने समावेश कराकारणकेस मुळात प्रथिनांनीच तयार झालेले असतात.

तणाव:
केस अकाली पांढरे होण्यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे तणाव. तुम्ही जेव्हा तणावाखाली असतातेव्हा त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. तेव्हा तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा कराअधूनमधून विश्रांती घ्याश्वसनाचे व्यायाम करा आणि डोक्याला मसाज करून घ्या.

धूम्रपान:
केस पांढरे होण्यामध्ये धूम्रपानाचा वाटा खूप मोठा असू शकतो. तुम्ही धूम्रपान करत असालतर ते सोडण्याची हीच वेळ आहे.

केसांचे अकाली पिकणे टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
शरीरातील ओलावा कायम राखा: भरपूर पाणी प्यायल्याने तसेच द्रवपदार्थ घेतल्याने तुमचे एकंदर आरोग्य तर सुधारतेचपण केसाच्या आरोग्यासाठी तर हे खूपच उत्तम आहे. शरीरात पुरेसे पाणी नसेल म्हणजेच ते डिहायड्रेटेड असेल तर केसांपर्यंत आवश्यक पोषक घटक पोहचू शकत नाहीतत्यामुळेकेसगळती किंवा केस पिकण्याची शक्यता वाढते.

व्यायाम: नियमित व्यायाम केल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केस साहजिकच अधिक निरोगी होतात.

तेलाने मसाज: आठवड्यातून एकदा टाळूला भृंग किंवा बदाम तेलऑलिव्ह तेल आदींचा वापर करून मसाज करा.

तुमचा शॅम्पू बदला: पोषकांनी समृद्ध आणि सौम्य प्रकारातील शॅम्पू वापरा. ऑरगॅनिक शॅम्पू किंवा हर्बल शॅम्पू सर्वोत्तम.

क जीवनसत्वाचा आहारातील समावेश वाढवा: केस पिकणे टाळण्यासाठी क जीवनसत्वाचे सेवन हा सर्वांत प्रभावी उपाय समजला जातो. तुमच्या आहारात संत्रीतसेच टरबुज-खरबुज वर्गातील फळांचा समावेश करा.

मासे अधिक प्रमाणात खाः अधिक प्रमाणात मासे खा. मासे सेलेनियम आणि प्रथिनांनी समृद्ध असतात. हे दोन्ही घटक केसांसाठी उत्तम आहेत.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजेकेस पांढरे झाले म्हणून त्रागा करू नकाकेसांचे पांढरे होणे स्वीकारा. अनेक केशरचनांच्या मदतीने आणि आता तर हेअर कलर्स उपलब्ध झाल्याने तुम्हाला हे केस छान मिरवता येतीलच.

No comments