Page Nav

HIDE

Breaking News:

latest

'हॉटस्टार' ने डिलीट केला हार्दिक-राहुलचा तो एपिसोड..!! पण का ?

' हॉटस्टार '   वरून  ' कॉफी विथ करण '   या प्रसिद्ध चॅट शोचा क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि के एल राहुलचा नुकताच प्रसारित झाले...

'हॉटस्टार' वरून 'कॉफी विथ करण' या प्रसिद्ध चॅट शोचा क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि के एल राहुलचा नुकताच प्रसारित झालेला एपिसोड डिलीट करण्यात आला आहे. शोमध्ये हार्दिक आणि लोकेश राहुल या दोघांनी महिलांविषयी काही आक्षेपार्ह वक्तव्य केली. दोघांवर त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रचंड टीका झाली. या वादाच्या पार्श्वभूमीवर आता ऑनलाइन स्ट्रिमिंग पार्टनर 'हॉटस्टार' वरून 'कॉफी विथ करण शो'चा तो एपिसोड काढून टाकण्यात आला आहे. त्याचबरोबर या शोचे सर्व टीझर आणि फोटो 'स्टार वर्ल्ड' या वाहिनीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून काढून टाकले आहेत.

महिलांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि केएल राहुलला चांगलचं भोवलं आहे. या दोन्ही खेळाडूंवर कारवाई करत बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वन डेमध्ये टीममधून त्यांना बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर या दोन्ही खेळाडूंवर कडक कारवाईही केली जाऊ शकते. या दोघांसाठी 15 दिवसांची चौकशी समिती नेमली जाऊ शकते. पंड्या आणि केएल राहुल यांना ऑस्ट्रेलियातून भारतात पाठवलं जाऊ शकतं.
हा एपिसोड पाहिल्यानंतर प्रत्येकाने पांड्यावर भरपूर टिका केली. सोशल मीडियावर चाहत्यांनी खूप राग व्यक्त केला. या विधानांवर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि सध्याचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली यानेही प्रतिक्रिया दिली आहे. भारताचा क्रिकेट संघ आणि जबाबदार क्रिकेटपटू म्हणून आम्ही या दोन्ही क्रिकेटपटूंनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करत नाही. त्यांनी व्यक्त केलेली मते ही त्यांची वैयक्तिक होती. संघाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. या प्रकरणी बीसीसीआय काय निर्णय घेतेयाची आम्ही वाट पाहतो आहोत. दरम्यानके. एल. राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी केलेल्या वक्तव्याचा संघाच्या मनोबलावर काहीही परिणाम झालेला नाहीअसेही त्याने स्पष्ट केले.

No comments