Page Nav

HIDE

Breaking News:

latest

'या' हॉट अभिनेत्रीने केला साखरपुडा, शेअर केला पहिला फोटो

अक्षय कुमार व रजनीकांत यांच्यासोबत  2.O  या चित्रपटात झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री अॅमी जॅक्सनने तिचा बॉयफ्रेंड जॉर्ज पानायीतोऊ सोबत साखरपुडा ...

अक्षय कुमार व रजनीकांत यांच्यासोबत 2.O या चित्रपटात झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री अॅमी जॅक्सनने तिचा बॉयफ्रेंड जॉर्ज पानायीतोऊ सोबत साखरपुडा केला आहे. अॅमीने इंस्टाग्रामवर त्याचा एक फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे.

अॅमी व तिचा ब्रिटीश बॉयफ्रेंड जॉर्ज हे गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. अॅमीने तिचे हे नाते सुरुवातीला सर्वांपासून लपवून ठेवले होते. मात्र गेल्या वर्षी व्हॅलेन्टाईन डे ला तिने तिच्या या नात्याविषयी सर्वांना सांगितले होते. जॉर्ज हा ब्रिटनमधील व्यावसायिक असून त्याचे वडील अँड्रीस पानायीतोऊ हे प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. हिल्टनडबल ट्री आणि पार्क प्लाझा अशी प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल्सचे ते मालक आहेत.

जॉर्ज ब्रिटीश प्रॉपर्टी डेव्हलपर अँड्रस पानायिटूचा मुलगा आहे. त्याचबरोबर हिल्टॉनडबल ट्रीपार्क प्लाझा यासारखी अनेक आलिशान हॉटेल्स जॉर्जच्या मालकीची आहेत. जॉर्जला एक भाऊ आणि तीन सावत्र बहिणी आहेत. अॅबिलीटी ग्रुपचा तो संस्थापक असून वयाच्या १६ वर्षी तो या ग्रुपमध्ये सहभागी झाला होता. ज़ॉर्जच्या वडिलांची संपत्ती ही ४०० मिलिअन पाऊंड असल्याचं म्हटलं जात आहे. जॉर्जकडे अनेक आलिशान आणि जगातल्या सर्वात महागड्या गाड्या देखील आहे. अॅमीला डेट करण्याआधी जॉर्जचं नाव अनेक महिलांसोबत जोडलं गेलं आहे.

No comments