Page Nav

HIDE

Breaking News:

latest

'ठाकरे' सिनेमा प्रदर्शितच होऊ देणार नाही ! संभाजी ब्रिगेडचा इशारा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  यांच्या आयुष्यावर आधारित  ' ठाकरे  '  सिनेमा येत्या २५ जानेवारीला चित्रपटगृहात येणार आहे. या सिनेमाच्...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे सिनेमा येत्या २५ जानेवारीला चित्रपटगृहात येणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लाच सेन्सॉर ने कात्री लावली होती. त्यानंतर देखिल या चित्रपटाचा ट्रेलर आऊट झाला होता. आता या सिनेमाला संभाजी ब्रिगेडने विरोध दर्शवला आहे. या चित्रपटातील एका दृश्यातून संभाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे.

'या सिनेमामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारत आहे. सिनेमामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पायात पादत्राणं घालून पुष्पहार अर्पण करतांना दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता असून सिनेमातील हे दृश्य छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणारे आहे. सिनेमातील हे दृश्य निर्माता आणि दिग्दर्शक यांनी तात्काळ वगळावे अन्यथा या दृश्यासह सिनेमा जर प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला तर संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात एकाही ठिकाणी हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाहीअसा इशारा संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक कपिल ढोके यांनी दिला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचे कर्तृत्त्व मोठे आहेत्याबद्दल आमच्या मनात काही शंकाच नाही. मात्र संभाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न ज्या दृश्यात झाला आहे ते दृश्य वगळण्यात यावे अशी आमची मागणी आहे असेही ढोके यांनी म्हटले आहे.

No comments