Page Nav

HIDE

Breaking News:

latest

'ठाकरे' चा मराठी ट्रेलर नव्या आवाजात प्रेक्षकांच्या भेटीला, बघा ट्रेलर

दिवंगत  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  यांच्या जीवनावर आधारित  ' ठाकरे '  चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या...

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरेचित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा मराठी ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये बाळासाहेबांना अभिनेता सचिन खेडेकरांचा आवाज देण्यात आला होता. मात्रहा आवाज बाळासाहेबांच्या आवाजाशी मिळताजुळता नसल्याचे म्हणत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता अखेर हा आवाज बदलण्यात आला आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर ठाकरे हा सिनेमा येतो आहे. या सिनेमाचा ट्रेलर जेव्हा रिलिज झाला तेव्हा त्यातल्या मराठी आवृत्तीतली एक गोष्ट अनेकांना खटकली. ती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना देण्यात आलेला सचिन खेडकर यांचा आवाज. मात्र आता हा आवाज बदलण्यात आला आहे. आवाजीतल बदलासह ट्रेलर रिलिज करण्यात आला आहे. बदललेल्या ट्रेलरमधला आवाज कुणाचा आहे हे समजू शकलेले नाही. मात्र हा आवाज बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजाइतकाच खणखणीत आहे. अगदी बाळासाहेब ठाकरेंनीच हे संवाद म्हटले आहेत असे वाटते आहे. त्यामुळे या बदलांसह आलेल्या ट्रेलरलाही युट्युबवर अनेक व्ह्यूज मिळाले आहेत.

No comments