Page Nav

HIDE

Breaking News:

latest

भाईजानच्या 'भारत' चित्रपटाचा टीजर 'या' दिवशी होणार प्रदर्शित

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्या  ' भारत '  चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. सलमानच्या  ' रेस- 3 &#...

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्या 'भारतचित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. सलमानच्या 'रेस-3चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर पाहिजे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे सलमानने 'भारतचित्रपटातून पुन्हा दमदार एन्ट्री करण्याचे ठरविले आहे. चाहत्यांनाही त्याच्या या चित्रपटाची उत्सुकता आहे. आता लवकरच या चित्रपटाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तगडी स्टारकास्ट असलेल्या सिनेमाचे टीजर 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सलमान खानकटरीना कैफतब्बूदिशा पाटनीसुनील ग्रोवर सिनेमात झळकणार आहेत. भारत सिनेमाचे दिग्दर्शन अली अब्बास जफरने केले आहे. निर्माता अतुल अग्निहोत्रीने ट्विटरवर भारत सिनेमाच्या टीजरची एक झलक शेअर केली आहे. व्हिडिओ शेअर करत अतुल अग्निहोत्रीने Countdown begins असे कॅप्शन दिले आहे.
भारत सिनेमा 2019 मध्ये ईदला रिलीज होणार आहे. टीजरची एक झलक पाहून अंदाज लावू शकतो की सिनेमा किती धमाकेदार असू शकतो. 2018 मध्ये आलेल्या रेस-3 चाहत्यांच्या पसंतीस उतरला नाही. अली अब्बस जफरसोबत सलमानचा तिसरा सिनेमा आहे. याआधी सुल्तान आणि टाइगर जिंदा है मध्य़े दोघांनी एकत्र काम केले होते. भारत सिनेमात सलमान 5 वेगवेगळ्या भूमिकेतून चाहत्यांच्या समोर येणार आहे. मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये सिनेमाचे शेवटचे शेड्यूल शूट होत आहे.

No comments