Page Nav

HIDE

Breaking News:

latest

अनेक वर्षांनंतर पुन्हा दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर हि जोडी दिसणार एकत्र

काही दिवसांपूर्वीच वृत्त आले होते की ,  अभिनेत्री दीपिका पदुकोन आपला पती रणवीर सिंह याच्यासोबत कपिव देव यांच्यावर आधारित  83  चित्रपटात दिसू...

काही दिवसांपूर्वीच वृत्त आले होते कीअभिनेत्री दीपिका पदुकोन आपला पती रणवीर सिंह याच्यासोबत कपिव देव यांच्यावर आधारित 83 चित्रपटात दिसून येणार आहे. मात्र हे वृत्त केवळ अफवा ठरले. आता वृत्त येत आहे कीदीपिका आपला एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर याच्यासोबत एका चित्रपटात दिसणार आहे.

पुन्हा एकदा दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर एका चित्रपटात एकत्र दिसणार असल्याची चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये सुरु आहे. लव रंजनच्या येणाऱ्या नवीन चित्रपटात दीपिका आणि रणबीर काम करणार आहेत. लव रंजनच्या येणाऱ्या नवीन चित्रपटात रणबीर कपूर आणि दीपिका तसेल लीड रोलमध्ये त्याचबरोबर अजय देवगण देखील या चित्रपटात दिसणार आहे. तसेच दीपिका या चित्रपटात फीमेल लीड रोलमध्ये आहे.

बॉलीवूडला रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणने अनेक हीट चित्रपट दिले आहेत. 'बचना ऐ हसीनो', 'ये जवानी है दिवानीआणि 'तमाशा' सारख्या चित्रपटात या जोडीला त्यांच्या चाहत्यांनी खूप पसंती दिली. अनेक दिवस ही जोडी कोणत्याच चित्रपटात एकत्र दिसली नाही. रणबीर आणि दीपिका पादुकोणच्या ब्रेकअपनंतर त्यांच्या चाहत्यांनी सुद्धा या दोघांना एकत्र पाहण्याची अपेक्षा सोडली होती. मात्र हे दोघे पुन्हा एकत्र दिसणार असल्याच्या वृत्तामुळे सध्या रणबीर आणि दीपिकाचे चाहते जास्त उत्साहीत आहेत.

दिग्दर्शक लव रंजन यांच्या चित्रपटात ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाची शुटींग 2019 मध्ये सुरू होणार असून चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होईलअसा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या चित्रपटात दीपिका आणि रणबीर यांच्याव्यतिरिक्त अजय देवगन देखील मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.

No comments