Page Nav

HIDE

Breaking News:

latest

प्रियाचा 'श्रीदेवी बंगलो' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शकाला बोनी कपूरकडून कायदेशीर नोटीस

आपल्या नजरेच्या अदांनी लाखो ह्रदयांना घायाळ करणाऱ्या  प्रिया प्रकाशचा  पहिलाच बॉलिवूड चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.  ' श्रीदेवी ...

आपल्या नजरेच्या अदांनी लाखो ह्रदयांना घायाळ करणाऱ्या प्रिया प्रकाशचा पहिलाच बॉलिवूड चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 'श्रीदेवी बंगलोया चित्रपटातून प्रिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अलिकडेच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आलाय. मात्रया टीजरवर चाहत्यांच्या नकारात्मक प्रतिक्रीया पाहायला मिळत आहेत. आता श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांनीही या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत माम्बुली यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

'श्रीदेवी बंगलो' चित्रपटात प्रिया एका अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसत आहे. टीजरच्या शेवटी या अभिनेत्रीचा मृत्यू बाथटबमध्ये झालेला दिसतोय. त्यातही तिचे नाव श्रीदेवी असे दाखविण्यात आले आहे. त्यामुळे हा चित्रपट श्रीदेवींच्या आयुष्याशी संबधीत असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. सोशल मीडियावर या टीजरवर नकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

अर्थातच सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर सिनेनिर्माते आणि श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी या सिनेमाला कायदेशीर नोटीस धाडलीय. या सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत माम्बुली यांनी आपल्याला बोनी कपूर यांच्याकडून नोटीस मिळाल्याचं मान्य केलंय.
'आम्हाला बोनी कपूर यांच्याकडून गेल्या आठवड्यात एक कायदेशीर नोटीस मिळालीय आणि आम्ही त्याला उत्तर देऊच. माझा सिनेमा हा एक सस्पेन्स थ्रीलर असेल. मी बोनी कपूर यांना हेदेखील सांगितलंय की सिनेमात श्रीदेवी हे सामान्य नाव आहे. माझ्या सिनेमाही एका अभिनेत्रीवर आधारित आहेअसं प्रशांत माम्बुली यांनी आमची सहयोगी वेबसाईट बॉलीवूडलाईफ.कॉमशी बोलताना म्हटलंय.


No comments