Page Nav

HIDE

Breaking News:

latest

'किंग खान' चा राकेश शर्माच्या बायोपिकमधून पत्ता कट, 'हे' आहे कारण?

बॉलिवूड  ' किंग खान '  शाहरुखच्या आगामी   ' सारे जहां से अच्छा '   या चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती. हा चित्रप...

बॉलिवूड 'किंग खानशाहरुखच्या आगामी 'सारे जहां से अच्छा' या चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती. हा चित्रपट अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटात सुरुवातीला आमिर खान मुख्य भूमिका साकारणार होता. नंतर यात शाहरुख भूमिका साकारणार असल्याचे त्याने सांगितले होते. मात्रआता शाहरुखनेही या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे.

राकेश शर्मावर आधारित बायोपिकचे नाव सुरुवातीला 'सॅल्यूट' असे होते. आमिर खानही त्याच्या 'महाभारतमध्ये व्यस्त असल्यामुळे या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. यात शाहरुख खान भूमिका साकारणार असल्याचेही त्याने सांगितले होते.

शाहरुखच्या 'झिरो' चित्रपटाला मिळालेल्या अपयशामुळे त्याला एका हिटची गरज असल्याने त्याने 'डॉन-३चित्रपट हाती घेतलाअसे बोलले जात आहे. त्याच्या 'झिरोचित्रपटाचे एकूण बजेट हे 200 कोटी होते. मात्रचित्रपटाने फक्त 89.25 कोटीचीच कमाई केल्याने हा चित्रपट फ्लॉप चित्रपट ठरला आहे. त्यामुळे आता 'सारे जहां से अच्छाचित्रपटातूनही बाहेर पडण्याचा निर्णय शाहरुखसाठी कितपत योग्य ठरतोहे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शाहरुखचा अलिकडेच प्रदर्शित झालेला 'झिरोचित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटाकडून त्याला बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्रप्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरविली. या चित्रपटानंतर 'तो सारे जहां से अच्छा'या चित्रपटाचे काम हाती घेणार होता. मात्रएका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसारआता त्याने या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचे कारण त्याचा आगामी चित्रपट 'डॉन-३हे सांगितले जात आहे. 'झिरोच्या अपयशामुळे शाहरुखने डॉन चित्रपटाच्या तिसऱ्या भागात भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला आहे.

Initially, Amir Khan was approached to play the lead in Saare Jahaan Se Achcha. However, due to prior work commitments, the actor had to opt out and he recommended SRK's name. For the unversed, the movie is based on the life of India’s first astronaut Rakesh Sharma and the movie will be helmed by Mahesh Mathai. Reportedly, the movie will go on floors in March and the sets are already being built at Film City in Mumbai. We will have to wait and see whether SRK works on both the films or chooses Don 3.

No comments