Page Nav

HIDE

Breaking News:

latest

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू सोबत स्क्रीन शेअर करणार कतरीना कैफ

आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री  कतरीना कैफने  मध्ये स्वतः चे स्थान निर्माण केलं आहे. खूप कमी वेळेत तिने आपला मोठा चाहता वर्ग निर्माण केल...

आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री कतरीना कैफने मध्ये स्वतः चे स्थान निर्माण केलं आहे. खूप कमी वेळेत तिने आपला मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. सध्या कतरीना सलमानच्या 'भारतचित्रपटामध्ये व्यस्त या चित्रपटानंतर ती चित्रपट दिग्दर्शक सुकुमार यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू स्क्रीन शेअर करणार असून ही जोडी मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

सध्या या चित्रपटाविषयी केवळ चर्चा सुरु असून अद्याप या चित्रपटाचं नाव निश्चित झालेलं नाही. मात्र या चित्रपटामध्ये कतरिना आणि महेश बाबू हे प्रमुख भूमिकेत असावे अशी चित्रपट दिग्दर्शकांची इच्छा असून त्यांनी याप्रकरणी दोन्ही कलाकारांकडे विचारणादेखील केली आहे. विशेष म्हणजे महेश बाबूने या चित्रपटासाठी होकार कळविला असून कतरिनाने मात्र अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यानजर कतरिनाने हा चित्रपट साईन केला तर 10 वर्षांमध्ये तिचा हा तिसरा तेलुगू चित्रपट ठरणार आहे. कतरिनाने यापूर्वी व्यंकटेश दुग्गुबती यांच्या 'मल्लिकाश्वरीआणि नंदमूरी बालकृष्ण यांच्या 'अलारी पिडुगुया चित्रपटामध्ये काम केलं आहे.

Telugu director Sukumar is planning his next with Katrina Kaif and Mahesh Babu. According to the latest reports, Sukumar is in talks with Katrina for her to play the lead in his untitled next. Even though no official announcement has been made about the film but we hear Mahesh Babu has already given his nod to the film and only Katrina’s response is awaited now.

No comments