Page Nav

HIDE

Breaking News:

latest

या महिन्यात करणार आलिया आणि रणबीर साखरपुडा?

बॉलिवूडमध्ये  सध्या प्रेमाचे आणि लग्नाचे वारे वाहत आहेत.  सोनम आनंद ,  दीपिका रणबीर , प्रियांका  निक  हे जोडपे 2018 मध्ये विवाह बंधनात अडकले...

बॉलिवूडमध्ये सध्या प्रेमाचे आणि लग्नाचे वारे वाहत आहेत. सोनम आनंददीपिका रणबीर, प्रियांका निक हे जोडपे 2018 मध्ये विवाह बंधनात अडकले आहेत. 2019 मध्ये कोणते जोडपे विवाह बंधनात बांधले जाणार.बॉलिवूडमध्ये सध्या आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या कपलच्या नात्याची चर्चा रंगत आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यात असलेल्या प्रेमसबंधांवर शिक्कामोर्तब झाले आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर विवाह बंधनात अडकणार आहेत. पण त्याआधी येत्या जूनमध्ये हे कपल साखरपुडा करणार असल्याची ताजी बातमी आहे.आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 'ब्रह्मास्त्रसिनेमाच्या शूटमध्ये बिझी आहेत.

अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेले जोडपे आलिया आणि रणबीर कपूर हे लवकरच लग्न करणार असल्याचे समजले आहे. हे कपल लवकरचं लग्नबंधनात अडकणारअसे म्हटले जातेय. पण त्याआधी येत्या जूनमध्ये हे कपल साखरपुडा करणार असल्याची ताजी बातमी आहे.

एका प्रसिद्ध मासिकाने याबद्दलचे वृत्त दिले आहे. 'ब्रह्मास्त्रचित्रपट रिलीज होण्यापूर्वी दोघेही साखरपुडा करणारअसे मानले जात आहे. खुद्द रणबीरची आई नीतू कपूर यांच्यासह अख्ख्या कपूर कुटुंबीयांची आणि भट कुटुंबाची तशी इच्छा आहे. 'ब्रह्मास्त्रयेत्या ऑगस्ट मध्ये प्रदर्शित होत आहे. त्यापूर्वी या दोघांनी साखरपुडा करावा अशी कुटुंबाची इच्छा आहे आणि म्हणूनच कुटुंबाच्या इच्छेखातर रणबीर आणि आलिया येत्या जूनमध्ये एन्गेज्ड होतीलअसे कळतेय.

येत्या जून मध्ये साखरपुडा आणि डिसेंबर मध्ये विवाह असा त्यांचा सध्याचा विचार आहे. या दोघांच्या कुटुंबीयांनी या नात्याला मान्यता दिली आहे. या दोघांचा ब्रम्हास्त्र सिनेमाचे शुटींग अंतिम टप्प्यात असून तो 20 डिसेंबर 2019 ला प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर विवाह करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

No comments