Page Nav

HIDE

Breaking News:

latest

'टोटल धमाल' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

अजय देवगन ,  अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या कॉमेडी सिनेमा  ' टोटल धमाल '   ट्रेलर प्रदर्शित झाला. इंद्र कुमार यांनी दिग्दर्शित...

अजय देवगनअनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या कॉमेडी सिनेमा 'टोटल धमाल' ट्रेलर प्रदर्शित झाला. इंद्र कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या 'धमालसीरिजचा तिसरा सिनेमा आहे. 'टोटल धमालसिनेमात अजय देवगनअनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत रितेश देशमुखअर्शद वारसीजावेद जाफरीसंजय मिश्राआणि पीतोबाश हे कलाकार सिनेमात झळकणार आहे. सिनेमात कोबरावन्यप्रणी त्याचप्रमाणे वाघ सुद्धा दिसणार आहे.

धमालची मजा यावेळी तिप्पट होणार आहे. यावेळी या चित्रपटात सिंहापासून ते सापापर्यंत आणि सायकलपासून ते हॅलिकॉप्टरपर्यंत सारे काही दिसणार आहे. टोटल धमाल चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहे. या चित्रपटातही आधीच्या चित्रपटाप्रमाणे सर्व कलाकार मंडळी 50 कोटी रुपयांच्या पाठीमागे धावताना दाखवले आहेत. चित्रपटात अनिल आणि माधुरी गुजराती जोडपे दाखवण्यात आले आहेत.

सिनेमाची खास गोष्ट म्हणजे हॉलिवूड अभिनेत्री क्रिस्टल सिनेमात झळकणार आहे. एका माकडाची भूमिका ती साकारणार आहे. 'हॅंगओवर 2', 'जॉर्ज ऑफ द जंगल', 'नाइट अॅट द म्यूझियमया हॉलिवूड सिनेमांमध्ये दिसली होती. सूत्रांच्या सांगण्यानुसार क्रिस्टल सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात क्रिस्टलची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. प्रेक्षक तिच्यामुळे पोट धरून हसतील. 'टोटल धमाल' सिनेमा 22 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

No comments