Page Nav

HIDE

Breaking News:

latest

'WhatsApp' मधील डेटा चोरी करण्यासाठी हॅकर्स करतात 'या' Apps चा वापर

WhatsApp  चा वापर देशात  25  कोटीहून अधिक युझर्स करतात. भारतात बहुतांश युझर्स व्हॉट्सअॅपचा अँड्रॉईड फोनवर वापर करतात. गुगल प्लेस्टोरवर उपलब्...

WhatsApp चा वापर देशात 25 कोटीहून अधिक युझर्स करतात. भारतात बहुतांश युझर्स व्हॉट्सअॅपचा अँड्रॉईड फोनवर वापर करतात. गुगल प्लेस्टोरवर उपलब्ध असणारे काही धोकादायक अॅप्स तुमच्या WhatsApp चा डेटा चोरी करू शकतात. आज आम्ही तुम्हाला सांगू तुम्ही कशाप्रकारे आपल्या WhatsApp चा डेटा चोरी होण्यापासून वाचवू शकता आणि कोणते अॅप्स WhatsApp च्या डेटाला प्रभावित करू शकतात.

हे Apps केवळ WhatsApp नाही तर अन्य सोशल मीडियासारखे अॅप्स जसे की फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा डेटा पण चोरी करू शकतात. सध्या ऑनलाईन वर्ल्डमध्ये सायबर सेक्युरिटी आणि ऑनलाईन हॅक्सवर बरीच चर्चा होत आहे. व्हॉट्सअॅप सारख्या इन्स्टंट मॅसेजिंग अॅपमध्ये अनेक सेक्युरिटी फिचर्स जसे की 'end-to-end encryption' पण जोडण्यात आले आहे. मात्रतरीही हे धोकादायक अॅप्स तुमच्या व्हॉट्सअॅपचा डेटा चोरी करू शकतात.

या अॅप्समध्ये अतिशय धोकादायक ठरू शकणारे मालवेअर असतात. जे तुमचा वैयक्तिक डेटा चोरी करू शकतात. तुम्ही विचार करत असणार की मालवेअर काय असतोमालवेअर एक सॉफ्टवेअर असतो जो संगणकस्मार्टफोन्स आणि सर्व्हरमधून डेटा चोरी करतो. अलीकडेच एका सेक्युरिटी रिसर्च टीमने 'ANDROIDOS_MOBSTSPY'  नावाचा मालवेअर शोधून काढला आहे जो तुमच्या व्हॉट्सअॅपसमेवत अनेक सोशलमीडिया अॅप्स आणि स्मार्टफोन्सला प्रभावित करतो. या मालवेअरला गुगल प्ले स्टोरमधून १ लाखाहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आलेले आहे.

सेक्युरिटी रिसर्च फर्मनुसार गुगल प्ले स्टोरमधून गेल्यावर्षी २०० हून अधिक देशांचे युझर्स या मालवेअरमुळे प्रभावित झाले. हा मालवेअर HZPermis Pro Arabe, Flappy Birr Dog, Win7imulator, Win7Launcher, FlashLight,  आणि Flappy Bird या Apps मध्ये आढळला आहे. ही माहिती जापानची सेक्युरिटी कंपनी Trend Micro ने दिली आहे. या कंपनीनुसार व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आलेला डेटा उदाहरणार्थ व्हिडिओ फाईल्सफोटो आणि ऑडियो यांना हा मालवेअर प्रभावित करतो.
Google ने हे सर्व धोकादायक अॅप्स प्लेस्टोरवरुन रिमूव्ह केले आहेत.
What is Malware
Malware (a portmanteau for malicious software) is any software intentionally designed to cause damage to a computer, server, client, or computer network.[1] Malware does the damage after it is implanted or introduced in some way into a target's computer and can take the form of executable code, scripts, active content, and other software. The code is described as computer viruses, worms, Trojan horses, ransomware, spyware, adware, and scareware, among other terms. Malware has a malicious intent, acting against the interest of the computer user—and so does not include software that causes unintentional harm due to some deficiency, which is typically described as a software bug.

No comments