Page Nav

HIDE

Breaking News:

latest

बाळासाहेबांसारखा दुसरा स्टार होणे नाही – Amir Khan

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  यांच्याशिवाय महाराष्ट्रात दुसरा स्टार नसल्याचे अभिनेता आमिर खान यांनी म्हटले आहे. ठाकरे हा सिनेमा येत्या 25 ज...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय महाराष्ट्रात दुसरा स्टार नसल्याचे अभिनेता आमिर खान यांनी म्हटले आहे. ठाकरे हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील "ठाकरेहा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अनेक चित्रपट निर्मातेबड्या बॅनरचे चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याबाबतचा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला होतायावर आमिर खान यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

त्याचदिवशी शौमिक सेन दिग्दर्शित चीट इंडिया आणि कंगनाचा मणिकर्णिका प्रदर्शित होणार आहे. त्याच दिवशी अजून कुठला सिनेमा रिलीज होऊ नयेअशी शिवसनेची इच्छा आहे.

दरम्यान ठाकरे चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या चित्रपटांनी आपली चित्रपट प्रदर्शनाची तारीख समोर ढकलली आहे. यावर पत्रकारांनी आमिरला प्रश्न केला असता. महाराष्ट्रात सगळ्यांना बाळासाहेबांचा चित्रपट पाहायचा आहे. नैसर्गिकपणे बाळासाहेबांशी कोणी निर्माता स्पर्धा करणार नाही. चित्रपट निर्माते योग्यवेळी फिल्म रिलीज करतात. वाद आणि स्पर्धा निर्माण होणार नाही याची सर्वजण काळजी घेतात. बाळासाहेंबापेक्षा मोठा स्टार नाहीअसे अमीर म्हणाला.

No comments