Page Nav

HIDE

Breaking News:

latest

विराट कोहलीला Zero चं प्रमोशन पडलं महागात

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मेलबर्न कसोटी सामन्यापूर्वी पत्नी अनुष्का शर्मासोबत   'Zero'   हा चित्रपट पाहिला. कोहलीने या चित...

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मेलबर्न कसोटी सामन्यापूर्वी पत्नी अनुष्का शर्मासोबत 'Zero' हा चित्रपट पाहिला. कोहलीने या चित्रपटातील सर्व कलाकारांचे आणि विशेष म्हणजे अनुष्काच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. कोहलीने ट्विट केले की, 'झिरो चित्रपट खूप चांगला आहे. या चित्रपटाने पूर्ण मनोरंजन केले आहे. मला खूप आवडला. सर्वच कलाकारांनी खूप चांगले काम केले आहे. अनुष्काचे काम फार आवडले. तिचे पात्र हे आव्हानात्मक होते. तरीही तिने ते चांगल्या पद्धतीने साकारले आहे.

कोहलीने याआधीही अनुष्काच्या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. 'झिरोमध्ये अनुष्काने शाहरुखसोबत मुख्य भूमिका साकारली आहे. त्यासह कॅटरिना कैफही या चित्रपटात आहे. या चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत असताना कोहलीने या चित्रपटाचे कौतुक केल्याने नेटिझन्स चांगलेच भडकले. त्यांनी कोहलीला संघातील 'Zero' कडे अर्थात लोकेश राहुलकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला.


No comments