Page Nav

HIDE

Breaking News:

latest

Xiaomi फोनसोबत मिळणार महिन्याला 10 GB डेटा फ्री

चीनची कंपनी शाओमी आपला  Xiaomi Play   हा स्मार्टफोन  24  डिसेंबर रोजी लाँच करणार आहे. कंपनीनं फोन लाँच करण्याआधीच एक भन्नाट ऑफर देऊ केली आहे...

चीनची कंपनी शाओमी आपला Xiaomi Play हा स्मार्टफोन 24 डिसेंबर रोजी लाँच करणार आहे. कंपनीनं फोन लाँच करण्याआधीच एक भन्नाट ऑफर देऊ केली आहे. हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकाला दर महिन्याला 10 जीबी डेटा फ्री देणार असल्याची घोषणा कंपनीनं नुकतीच केली आहे.

ITHome च्या रिपोर्टनुसारशाओमी Mi Unlimited Data Plan सोबत लाँच करणार आहे. हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकाला सुरुवातीला 10 जीबी डेटा फुल स्पीडचा दिला जाणार आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना वर्षभर मोफत इंटरनेट डेटा मिळू शकणार आहे. वर्षभर फ्री देण्यात येणारा डेटा स्वतः कंपनी देणार की कंपनी दुसऱ्या कंपनीसोबत करार करणार यासंबंधीची माहिती अद्याप समोर आली नाही. रिपोर्ट्सच्या माहितीनुसारफोनमध्ये एक असे App असणार आहे. ज्यामधून युजर्सला फ्री इंटरनेट मिळू शकेल.

Xiaomi Play नाव असल्याने कंपनी त्याला गेमिंग स्मार्टफोन म्हणून लाँच करण्याची तयारी करीत आहे. या फोनचे टीझरही समोर आले आहे. हा फोन ब्लू कलरमध्ये असणार असून यात वॉटरड्रॉप नॉच देण्यात आला आहे. रिअरचा ड्यूल कॅमेरा सेटअप आणि फ्लॅश असणार आहे. प्लेमध्ये रिअर फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे.

5.84 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला असून 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इ्ंटरनल स्टोरेज 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेजचा असे फोन उपलब्ध करण्यात आले आहे. 2900 mAh बॅटरीची क्षमता देण्यात आली आहे.

No comments