Page Nav

HIDE

Breaking News:

latest

Video : “दगडी चाळ 2” लवकरच | सिनेसृष्टीत पुन्हा चुकीला माफी नाही

संगीता अहिर  निर्मित आणि चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या  ‘ दगडी चाळ ’   या चित्रपटाने चांगलं यश मिळवलं होतं. गँगवॉर...

संगीता अहिर निर्मित आणि चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या दगडी चाळ या चित्रपटाने चांगलं यश मिळवलं होतं. गँगवॉर हा चित्रपटाचा केंद्रबिंदू होता. मात्र त्यात हळुवार फुलत जाणारी प्रेमकथाही होती. चित्रपटाचं कथानकत्यातील संवादAction सीन्स आणि गाणी सर्व काही प्रेक्षकांना आवडलं होतं. चुकीला माफी नाही हा मकरंद देशपांडेचा डायलॉग विशेष गाजला होता.

दगडी चाळ मध्ये डॅडी हे वास्तविक पात्र असलं तरी कथा काल्पनिक होती. दुसऱ्या भागाची कथादेखील डॅडीभोवती फिरणार असून कथा काल्पनिक असणार आहे. या चित्रपटात काय नवीन पाहायला मिळणारयाकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेच.

चित्रपटात कोणाची वर्णी लागली आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही. चित्रपटाची निर्मिती पुन्हा एकदा संगीता अहिरच करणार आहेत. दगडी चाळ २ च्या दिग्दर्शनाची जबाबदारी पुन्हा एकदा चंद्रकांत कणसे यांच्या खांद्यावर असणार आहे. नवीन वर्षात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

या चित्रपटात काय नवीन पाहायला मिळणारयाकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेच. शिवाय या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट ज्या व्यक्तीवर आधारित आहेत्या 'डॅडीं' ची कन्या योगिता गवळी खुद्द या सिनेमाच्या सहनिर्मितीची धुरा सांभाळत आहे. त्यामुळे आता 'दगडी चाळ २'ही प्रेक्षकांसाठी उत्कंठावर्धक ठरेलयात शंकाच नाही.

डॅडींच्या भूमिकेत मकरंद देशपांडे अगदी चपखल बसला होता. त्यामुळे तोच या सिनेमात असण्याची शक्यता आहे. फक्त अंकुश चौधरीची भूमिका तोच करणार की अजून कोणी हे कळायचंय. अर्थात या चित्रपटात कोणाची वर्णी लागली आहेहे मात्र अद्याप गुलदस्त्यात असले तरी या चित्रपटाची निर्मितीही संगीता अहिरच करणार आहेत. पहिल्या चित्रपटाप्रमाणे 'दगडी चाळ २चं दिग्दर्शनही चंद्रकांत कणसे करणार असल्यानं पुन्हा प्रेक्षकांना काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. नवीन वर्षात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.


No comments