Page Nav

HIDE

Breaking News:

latest

Simmba Box Office Collection Day 1: पहिल्याच दिवशी 'सिंबा'-नं केली धमाकेदार कमाई, जाणून घ्या आकडा

रणवीर सिंग  आणि  सारा अली खान  यांच्या मुख्य भूमिका असलेला  ' सिंबा '  चित्रपट  28  डिसेंबरला प्रदर्शित झाला. रोहित शेट्टीचे दिग्दर्...

रणवीर सिंग आणि सारा अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेला 'सिंबाचित्रपट 28 डिसेंबरला प्रदर्शित झाला. रोहित शेट्टीचे दिग्दर्शन अन् रणवीरच्या अॅक्शनने प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत खेचून आणलं. चित्रपटाला मिळालेला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहता चित्रपटाने पहिल्या दिवशी 20 कोटींहून अधिक कमाई केली असल्याचा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक गिरीष जोहर यांनी एका माध्यामाशी बोलताना वर्तवला आहे.

ऑस्ट्रेलियातही या चित्रपटाने 88.58 लाखांची कमाई केली आहे. चित्रपटात रणवीरने संग्राम भालेराव नावाच्या पोलिसाची भूमिका साकारली आहे. चित्रपट भारतात 4020 स्क्रीनवर तर जगभरात 963 स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. यातील रणवीरच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी विशेष कौतुक केले आहे.

सारा अली खानचा हा दुसरा चित्रपट ठरला असून पहिल्यांदाच ती रणवीरसोबत स्क्रीन शेअर करत आहे. चित्रपटातील या जोडीलाही प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे.

No comments