Page Nav

HIDE

Breaking News:

latest

Riteish Deshmukh Birthday Special | सर्व शैलींचा एक हिरो

अभिनेता रितेश देशमुखने  लातूरमध्ये 1978 मध्ये जन्मलेल्या रितेशने रामोजी राव यांच्या   ' तुझे मेरी कसम '  या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये...

अभिनेता रितेश देशमुखने लातूरमध्ये 1978 मध्ये जन्मलेल्या रितेशने रामोजी राव यांच्या  'तुझे मेरी कसमया चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याची नायिका होती जेनेलिया डिसुझा. हिच जेनेलिया त्याच्या आयुष्याची साथीदार बनली. 2003 मध्ये 'तुझे मेरी कसम' चित्रपट आला आणि रितेशची वाहवा झाली. त्यानंतर 2004 मध्ये आलेल्या 'मस्तीया विनोदी चित्रपटाने आणि 'बर्दाश्तया चित्रपटाने त्याच्या लोकप्रियतेत भर टाकली.

अभिनेता रितेश देशमुखने हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठीतही तो आघाडीचा नायक म्हणून ओळखला जातो. लय भारी चित्रपटातून रांगड्या माऊलीची भूमिका साकारल्यानंतर या महिन्यात त्याचा माऊली चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय आणि तुफान गर्दीत तो लोकप्रिय झालाय. आज त्याचा 40 वाढदिवस साजरा होत आहे. बॉलिवूडच्या लांबलचक कारकिर्दित 'क्या कूल है हम', 'हे बेबी', 'धमाल', 'हाउसलफुल', 'तेरा नाल लव्ह हो गयाआणि 'मस्तीयासारख्या चित्रपटातून अभिनय केला आहे.

रितेश गेली 15 वर्षे चंदेरी दुनियेत यशस्वी अभिनेता म्हणून वावरतोय. 'ग्रँड मस्ती', 'ग्रेट ग्रँड मस्ती' 'हाउसफुल 2', 'हाउसफुल 3', 'बैंगिस्तान', 'क्या सुपर कूल हैं हम', 'डबल धमाल', 'जाने कहां से आयी है', 'अलादीन', 'अपना सपना मनी मनीऔर 'एक विलेन' यासारख्या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

विलासराव देशमुख आणि वैशाली देशमुख यांचा सुपुत्र असलेला रितेश राजकारणापासून चार हात लांबच राहिला आहे. अनेक लोकांना माहिती नसेल की रितेशने आपल्या करियरची सुरुवात एक आर्किटेक म्हणून केली होती.

रितेशने मुंबईतील कमला रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून आर्किटेक्टचे शिक्षण घेतले. त्यानंतर परदेशात जाऊन एका आर्किटेक्ट फर्ममध्ये एक वर्षे प्रॅक्टीसही केली. अभिनयस्वतःचे प्रॉडक्शन हाऊस यात बिझी असलेला रितेश आर्किटेक्चरल अँड इंटीरियर डिजाइनिंग फर्म 'इवोल्यूशन्सदेखील चालवतो.
रितेशने 2013 मध्ये आपल्या स्वतःच्या 'मुंबई फिल्म कंपनीया प्रॉडक्शन हाऊसची स्थापना करीत 'बालक पालक' या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. त्यानंतर 'लय भारीया चित्रपटातून रितेशने मराठी सिनेसृष्टीत दमदार पाऊल टाकले.

रितेशचा विवाह 2 फेब्रुवारी 2012 मध्ये Genelia D'Souza सोबत झाला. त्यांना 25 नोव्हेंबर 2014 रोजी पहिला मुलगा झाला.1 जून 2016 रोजी रितेश - जेनिलियाला दुसरा मुलगा झाला.  त्याच्या 'हाउसफुल 3' चित्रपटाने भरपूर गल्ला जमवलाय तर 'बँजोया चित्रपटानेदेखील सर्वांची वाहवा मिळवली. त्याच्या प्रॉडक्शन हाऊसचा 'फास्टर फेणेचित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपट निर्मितीत तो सध्या गुंतलाय.

Riteish Deshmukh Movies List:

Year
Title
2003
Tujhe Meri Kasam
2003
Out of Control
2004
Masti
2004
Bardaasht
2004
Naach
2005
Kyaa Kool Hai Hum
2005
Mr Ya Miss
2005
Bluffmaster!
2006
Fight Club - Members Only
2006
Malamaal Weekly
2006
Darna Zaroori Hai
2006
Apna Sapna Money Money
2007
Cash
2007
Heyy Babyy
2007
Dhamaal
2008
De Taali
2008
Chamku
2009
Do Knot Disturb
2009
Aladin
2010
Rann
2010
Jaane Kahan Se Aayi Hai
2010
Housefull
2011
F.A.L.T.U
2011
Double Dhamaal
2011
Koochie Koochie Hota Hai
2012
Tere Naal Love Ho Gaya
2012
Housefull 2
2012
Kyaa Super Kool Hain Hum
2013
Grand Masti
2014
Humshakals
2014
Ek Villain
2014
Lai Bhaari
2015
Bangistan
2016
Housefull 3
2016
Great Grand Masti
2016
Banjo
2017
Bank Chor
2018
Welcome to New York
2018
Mauli
2019
Total Dhamaal
2019
MarJaavaan


No comments