Page Nav

HIDE

Breaking News:

latest

RBI लवकरच बाजारात आणणार 20 रुपयांची नवी नोट

रिझर्व्ह बँक  लवकरच २० रुपयांची नवी नोट बाजारात आणणार आहे. आरबीआयच्या एका अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेन...

रिझर्व्ह बँक लवकरच २० रुपयांची नवी नोट बाजारात आणणार आहे. आरबीआयच्या एका अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांची आणि २०० रुपयांची नवी नोट बाजारात आणली होती.  ५००१००५० आणि १० रुपयांच्याही नव्या नोटा याआधीच चलणात आणल्या होत्या. २०१६ पासूनच रिझर्व्ह बँकेकडून महात्मा गांधी श्रेणीतील नव्या नोटा ठराविक अंतराने बाजारात आणल्या जात आहेत. या नोटांचा आकार आणि डिझाईन आधीच्या नोटांपेक्षा वेगळा आहे.

रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार३१ मार्च २०१६ पर्यंत २० रुपयांच्या नोटांची संख्या ४.९२ अब्ज इतकी होती. मार्च २०१८ पर्यंत ती १० अब्ज झाली. ही संख्या चलनातील एकूण नोटांच्या ९.८ टक्के इतकी आहे. असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे.

माहितीनुसार, 20 रुपयांच्या नव्या नोटेचा रंग लाल असू शकतो. ही नोटही महात्मा गांधींच्या सीरिजमधलीच असणार आङे. या नोटेची रंगसंगती आणि आकार आधीच बाजारात उपलब्ध असलेल्या नोटेपेक्षा वेगळा असणार आहे. 

आरबीआयच्या माहितीनुसारमार्च 2018 मध्ये देशात 20 रुपयांच्या 10 कोटींच्या नव्या नोटा चलनात होत्या. मार्च 2016 मध्ये 4.92 कोटींच्या मुकाबल्यात हा आकडा दुप्पट होता. मार्च 2018 पर्यंत चलनात असलेल्या 20 रुपयांच्या नोटांची एकूण भागीदारी बाजारात 9.8 टक्के एवढी आहे. रिझर्व्ह बँकेनं काही महिन्यांपूर्वी 100 रुपयांची नवी नोटही जारी केली होती. आरबीआयनं जुलैमध्येच या नोटेची घोषणा केली होती.  

No comments