Page Nav

HIDE

Breaking News:

latest

MPSC मध्ये पदांच्या संखेत वाढ, 360 पदांची नवीन जाहिरात भरतीत मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण

मराठा समाजाला  16  टक्के  आरक्षण राज्य सरकारने जाहीर केले. त्यानंतर निघालेल्या शासन निर्णयात खुल्या प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात...

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण राज्य सरकारने जाहीर केले. त्यानंतर निघालेल्या शासन निर्णयात खुल्या प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. मात्र त्यानंतर नवीन शासन निर्णय काढून मराठा समाजाला स्वतंत्र 16 टक्के आरक्षण देण्यात आले. त्यानुसार एमपीएससीने आता नवीन जाहिरात काढली असून 342वरून 360 पदसंख्या वाढविण्यात आली आहे.

एमपीएससीकडून नव्याने काढलेल्या या जाहिरातीनुसार अर्ज करण्यासाठी 4 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पूर्वपरीक्षा 17 फेब्रुवारीला तर मुख्य परीक्षा 13, 14, 15 जुलै 2019 रोजी घेण्यात येणार आहेत. सुधारित जाहिरातीनुसार उपजिल्हाधिकारी 40 जागापोलीस उपअधीक्षक/सहाय्यक पोलीस आयुक्त पदासाठी 16 जागाउपमुख्य कार्यकारी पदासाठी 21 जागातहसीलदार पदाच्या 77 जागाउपशिक्षणाधिकारी 25 जागाकक्ष अधिकारी 16 जागासहाय्यक गट विकास 11 जागानायब तहसीलदार 113 जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी https://mahampsc.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहेत.


No comments