Page Nav

HIDE

Breaking News:

latest

'हे' आहेत तुमच्या स्मार्टफोनसाठी धोकादायक अॅप्स | Google ने Play Store 22 अॅप्स हटवले

गुगल  सध्या प्ले स्टोरवर व्हायरससह अपलोड करण्यात आलेल्या अॅप्सचा शोध घेत आहे. दरम्यान गुगलने प्लेस्टोरवरुन २२ अॅप्स हटवले आहेत. या अॅप्समध्य...

गुगल सध्या प्ले स्टोरवर व्हायरससह अपलोड करण्यात आलेल्या अॅप्सचा शोध घेत आहे. दरम्यान गुगलने प्लेस्टोरवरुन २२ अॅप्स हटवले आहेत. या अॅप्समध्ये व्हायरस असल्याचे म्हटले जात आहे. गुगलनुसार या सर्व अॅप्समध्ये धोकादायक व्हायरस लपलेले आहेत. या सर्व अॅप्सचा वापर ऑनलाईन फ्रॉडसाठी करण्यात येत असल्याचे गुगलने म्हटले आहे.

हे अॅप्स २ मिलियन म्हणजे २० लाख वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. गुगलला 'Sophosनावाच्या सायबर सेक्युरिटी कंपनीने या अॅप्ससंबंधी माहिती दिली आहे. Sophos ला तपासात आढळलेकी हे अॅप्स Andr आणि Clickr अॅडच्या नेटवर्कशी जुळलेले आहेत. कंपनीने आपल्या अहवालात नमूद केले आहेकी हे सर्व व्हायरस अतिशय व्यवस्थितरित्या अॅप्समध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. हे व्हायरस युझर्सला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहचवू शकतात. इतकेच नाही तर हे व्हायरस संपूर्ण अँड्रॉईड इकोसिस्टमला मोठी हानी पोहचवू शकतात. कारण हे अॅप्स या अॅड नेटवर्कवर फेक क्लिक करुन रेव्हेन्यू जनरेट करतात आणि फेक रिक्वेस्ट पाठवतात.

Sophos ने ब्लॉगमध्ये लिहिले आहेकी अॅप्समध्ये व्हायरस असल्यामुळे युझर्सच्या मोबाईलची बॅटरीही लवकर ड्रेन होते. याशिवाय डेटा पण खर्च होतो. याचे प्रमुख कारण या व्हायरसचे बॅकग्राउंडमध्ये कंपनीच्या सर्व्हरशी कनेक्ट होणे आणि कनेक्टिव्हिटी कायम राखणे आहे.

स्मार्टफोनला धोकादायक ठरणारे अॅप्स:
 1. Sparkle FlashLight
 2. Snake Attack
 3. Math Solver
 4. ShapeSorter
 5. Tak A Trip
 6. Magnifeye
 7. Join Up
 8. Zombie Killer
 9. Space Rocket
 10.  Neon Pong
 11. Just Flashlight
 12. Table Soccer
 13. Cliff Diver
 14. Box Stack
 15. Jelly Slice
 16. AK Blackjack
 17. Color Tiles
 18. Animal Match
 19. Roulette Mania
 20. HexaFall
 21. HexaBlocks
 22. PairZap

No comments