Page Nav

HIDE

Breaking News:

latest

Death Anniversary | जाणून घ्या, आपल्या आवडत्या ‘लक्ष्या’ बद्दल

मराठी  चित्रपटसृष्टीमध्ये आजवर अनेक गुणी कलाकरांनी त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली. या साऱ्या उत्तम कलाकारांच्या गर्दीत आजही एक...

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आजवर अनेक गुणी कलाकरांनी त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली. या साऱ्या उत्तम कलाकारांच्या गर्दीत आजही एक नाव कायम अग्रस्थानी आहे ते म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. आज लक्ष्मीकांत यांचा स्मृतिदिन. सगळ्यांना खळखळून हसविणाऱ्या या विनोदाच्या बादशहाने १६ डिसेंबर २००४ साली जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानामुळे आजही ते साऱ्यांच्या स्मरणात आहेत. अशी ही बनवा बनवीपासून ते अगदी एक होता विदूषक’ या चित्रपटापर्यंत आपल्याला लक्ष्मीकांत बेर्डे यांची वेगळी रुपं पाहण्याची संधी मिळाली. मुख्य म्हणजे आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा अभिनेता कधी सर्वांचा आवडता लक्ष्या’ झाला हे लक्षातही आलं नाही.

मुंबईतील गिरगावमधील कुंभारवाड्यात लहानाचा मोठा झालेल्या लक्ष्याने युनियन हायस्कूलमध्ये त्याचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर भवन्स कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेतलं. याचदरम्यान कॉलेजमध्ये असताना ते एकांकिकांमध्ये सहभाग घेत होते. अनेक वेळा साहित्य संघ मंदिरात त्यांनी बॅक स्टेजवरही काम केलं. याकाळामध्ये त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. हा प्रवास सुरु असतानाच त्यांच्या टूरटूर’ या नाटकाने यशाचं शिखर गाठलं. त्यानंतर त्यांना महेश कोठारेच्या धुमधडाका’ (१९८५) या चित्रपटातून मोठा ब्रेक मिळाला. टूरटूर’ आणि धुमधडाका’ या दोन्ही माध्यमातून त्यांनी आपले अष्टपैलुत्व दाखवून प्रचंड लोकप्रियता मिळवली.

नाटकाच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांपर्यंत पोहचता येते म्हणून त्याने कार्टी उडाली भुर्र…’ स्वीकारले. मराठी नाटकचित्रपटांचा हा प्रवास सुरु असतानाच मैने प्यार किया’ या चित्रपटामधून त्यांचा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. त्यानंतर साजन’, ‘हम आपके हैं कौन’ इत्यादींत त्यांनी काम केले.

मराठीत दे दणादणअशी ही बनवाबनवीथरथराटधडाकेबाजहमाल दे धमालरंगत संगतपटली रे पटली असे करत करत ते डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित एक होता विदूषक (१९९२) पर्यंत पोहचले. त्याच्या कारकीर्दीतील हा खूपच महत्त्वाचा टप्पा. जोडीला वर्षा उसगावकरदिलीप प्रभावळकरनिळू फुलेमधु कांबिकरउषा नाईकपूजा पवारविजय चव्हाण अशा तगड्या कलाकार मंडळींची साथही त्यांना मिळाली होती.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सिनेमाच्या या रंगीत दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर मराठी सिनेमाच नाहीतर नाटक आणि हिंदी सिनेमातूनही स्वत:चा असा वेगळा ठसा उमटवत अनेक भूमिका अजरामर केल्या.  

१९८९ मध्ये मैंने प्यार किया या चित्रपटातून लक्ष्मीकांत यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. या चित्रपटात सलमान खान लीड रोलमध्ये होता. यानंतर लक्ष्मीकांत यांनी सलमानच्या अनेक चित्रपटात काम केले. भलेही त्यांनी नोकराची भूमिका साकारली. पण आपल्या शानदार अभिनयामुळे ते नोकर नाही तर त्या चित्रपटाचे हिरो ठरले. सलमानसोबत लक्ष्मीकांत यांचे खूप चांगले बॉन्डिंग होते. त्यामुळेच लक्ष्मीकांत गेलेत्यादिवशी सलमान खान अगदी ढसाढसा रडला होता.

लक्ष्मीकांत यांनी अभिनय आर्ट्स’ नावाचे प्रॉडक्शन हाऊसही सुरू केले.  लक्ष्मीकांत बेर्डे उत्कृष्ट गिटारवादक होतेहे फार कमी जणांना ठाऊक आहे. लक्ष्मीकांत बेर्डे शिस्तप्रिय होते. रात्री कितीही उशीरा झोपलेतरी सकाळी वेळेत ते सेटवर हजर असायचे.  लक्ष्मीकांत यांचा शॉट आहे म्हटल्यावर त्यांच्या हिरोईन्ससुद्धा वेळेत सेटवर हजर असायच्या. एक होता विदुषकच्या अपयशामुळे लक्ष्मीकांत खचून गेले होते. त्या चित्रपटाच्या अपयशाच्या दु:खातून ते शेवटपर्यंत बाहेर पडू शकले नाहीतअसे प्रिया यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.


No comments