Page Nav

HIDE

Breaking News:

latest

Bollywood Flashback Of 2018: बॉक्स ऑफिसवर यंदा मोठ्या मोठ्या बिग बजेट चित्रपटांचा धुराळा

बॉलिवूडसाठी  यंदाचे हे वर्ष अनेक गोष्टींना कलाटणी देणारे ठरले. अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला आले. अनेक नवे...

बॉलिवूडसाठी यंदाचे हे वर्ष अनेक गोष्टींना कलाटणी देणारे ठरले. अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला आले. अनेक नवे चेहऱ्यांनाही मोठ्या पडद्यावर संधी मिळाली. मात्रनेहमीप्रमाणे बॉक्स ऑफिस गाजवणारे तिनही 'खानयावर्षी मात्र फिके पडले. फक्त 'खानांच्या' नावावर चालणाऱ्या चित्रपटाची जादु यावर्षी मात्र ओसरताना दिसली. कथा हाच चित्रपटाचा मुळ गाभा असते. हे 2018 वर्षाने सिद्ध केले आहे.

बॉक्स ऑफिसवर यंदा मोठ्या मोठ्या बिग बजेट चित्रपटांचा धुराळा उडाला. या उलट अल्प बजेट चित्रपटांनी मात्र बाजी मारली. यात 'स्त्री', 'अंधाधून', 'बधाई हो' यांसारख्या चित्रपटांनी मनोरंजनाची व्याख्याच बदलली. बॉक्स ऑफिसवर त्यांना दमदार यशही मिळाले. या चित्रपटांच्या शर्यतीत तिनही खानांचे चित्रपट मात्र जोरदार आपटले. सलमान खानचा 'रेस'आमिर खानचा 'ठग्स ऑफ हिंदोस्तानआणि आता शाहरुख खानचा 'झिरो'. तिनही चित्रपटांचा बराच गाजावाजा झाला. प्रेक्षकांना या चित्रपटांकडून मोठ्या अपेक्षाही होत्या. मात्रखानांचे हे चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात सपशेल अपयशी ठरले.

यंदा संजूपद्मावत२.०बागीराझीगोल्डरेडसोनु की टिटू की स्विटी यांसारख्या चित्रपटांनी त्यांच्या बजेटपेक्षा चांगली कमाई केली. नुकताच रिलीज झालेल्या 'सिंबाचित्रपटालाही प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय.

याबाबत फॉक्स स्टार स्टुडिओचे सीईओ विजय सिंग म्हणालेकी 'आता चित्रपटांची रचना बदलत चाललीये. चित्रपटात कोण भूमिका साकारत आहे यावर प्रेक्षक अवलंबून न राहता आता चित्रपटाची कथा कशी आहेहे पाहून चित्रपट पाहण्यास पसंती देतात. चित्रपट निर्मात्यांनी आता कथा आणखी कशी चांगली असावी यावर भर द्यायला हवा. यावर्षात चांगली कथा असलेल्या चित्रपटांनीच बॉक्स ऑफिसवर बाजी मारली'.

'तिनही खानांचे चित्रपट फक्त एक-दोन दिवसच बॉक्स ऑफिसवर टिकलेमात्रनंतर या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. आता प्रेक्षकांना नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे पाहण्याची इच्छा आहेहे लक्षात घेऊन निर्मात्यांनी चित्रपट बनवावे', असेही ते पुढे म्हणाले.


No comments