Page Nav

HIDE

Breaking News:

latest

हेअर डाय करताय? मग या गोष्टींची काळजी घ्या..

केस काळे  असणे हे तारुण्याचे लक्षण असते. मग वयोमानानुसार कींवा अगदी कमी वयात ते पांढरे व्हायला लागले की आपण अस्वस्थ होतो. हेअर डाय करणे हा य...

केस काळे असणे हे तारुण्याचे लक्षण असते. मग वयोमानानुसार कींवा अगदी कमी वयात ते पांढरे व्हायला लागले की आपण अस्वस्थ होतो. हेअर डाय करणे हा यावरील एक सोपा उपाय असतो. इतकेच नाही तर हल्ली फॅशन म्हणूनही तरुण-तरुणी केसांना वेगवेगळ्या रंगाचे हेअर डाय करतात.

कधी हा डाय घरी केला जातो तर कधी पार्लरमध्ये जाऊन. वेगवेगळ्या कंपन्यांच्या डायमध्येही बरीच स्पर्धा असते. काही वेळा या डायची अॅलर्जी होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे केसांना डाय लावताना कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी

1.) किंमतीकडे विशेष लक्ष द्या – तुम्ही केसांसाठी शाम्पूकंडीशनरसिरम,  हेअर डाय खरेदी करायला जाता तेव्हा ते चांगल्या ब्रँडचे घेणे आवश्यक आहे. ही उत्पादने थेट आपल्या केसांशी निगडीत असल्याने स्वस्तातील गोष्टी खरेदी करणे धोक्याचे ठरु शकते. त्यामुळे डाय हा चांगल्या कंपनीचाच असेल याची काळजी घ्या.

2.) केसांची योग्य ती देखभाल घ्या – डाय केल्यानंतर तुमचे केस जास्त मुलायम आणि चमकदार होतात. पण डायमध्ये असणाऱ्या रासायनिक घटकांमुळे केस रफ होतात. तसेच केसांचा मूळ रंग डायमुळे खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही नियमित डाय करत असाल तर केसांची योग्य पद्धतीने देखभाल करणे आवश्यक आहे.

3.) केस सतत धुवू नयेत – डाय हा केसांना वरुन लावलेला एकप्रकारचा लेप असतो. केस मुलायम आणि चांगले दिसावेत यासाठी ते सारखे धुण्याची पद्धत आहे. मात्र डाय केल्यावर केस सतत धुतल्यास हा डाय लवकर निघून जातो. त्यामुळे डाय केल्यावर केस सतत धुवू नयेत.

4.) केसांना फाटे फुटण्याची शक्यता – केसांचा पोत खराब होतो तेव्हा केसांना फोट फुटतात. डाय केल्यानंतर सुरुवातीला मुलायम वाटणारे केस नंतर कोरडे वायाटला लागतात आणि त्यांना फाटेही फुटतात. डायमध्ये असणारे ब्लिच केस कोरडे होण्यास कारणीभूत ठरु शकतात.


Tags: Insurance $57 CPC, Gas/Electricity $54 CPC, Mortgage $47 CPC, Attorney $47 CPC, Loans $44 CPC, Lawyer $42 CPC, Donate $42 CPC, Conference Call $42 CPC, Degree $40 CPC, Credit $38 CPC 

No comments