Page Nav

HIDE

Breaking News:

latest

आता या दिग्दर्शकाच्या मुलीला लाँच करणार सलमान?

अभिनेता  सलमान खानने  चित्रपटात अनेक नवीन चेहरे दिले. तसेच अनेक स्टारकिड्सला संधी दिली. एकीकडे सलमान मोहनीश बहल यांची मुलगी प्रनुतन बहल हिला...

अभिनेता सलमान खानने चित्रपटात अनेक नवीन चेहरे दिले. तसेच अनेक स्टारकिड्सला संधी दिली. एकीकडे सलमान मोहनीश बहल यांची मुलगी प्रनुतन बहल हिला लॉन्च करणार असताना डायरेक्टर आणि अभिनेते महेश मांजरेकर यांच्या मुलीला देखील सलमान खान बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार असल्याचे वृत्त आले आहे.

महेश मांजरेकर आणि सलमान खान यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानने महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या याला लॉन्च करण्याचे ठरवले होते. मात्र आता सध्या तरी अश्वामी हिला सलमान लॉन्च करणार असल्याचे समोर आले आहे. खुद्द महेश मांजरेकर यांनी देखील याची पुष्टी केली आहे.

मांजरेकर आणि सलमान यांच्यातील मैत्री ही कलाविश्वासाठी नवी नाही. काही चित्रपटांमध्येही त्यांनी एकत्र काम केलं आहे. त्यामुळे आपल्या या मित्राची मदत करण्यासाठीही सलमान खऱ्या अर्थाने धावला आहे असं म्हणायला हरकत नाही. सूरज पांचोलीडेझी शाहसोनाक्षी सिन्हाआयुष शर्मा आणि अशा बऱ्याच कलाकारांच्या यादीत आता मांजरेकरांच्या मुलीचा म्हणजेच अश्वमीचाही समावेश होणार आहेअसं म्हणायला हरकत नाही.

अश्वमी नेमकी कोणत्या भूमिकेतकोणत्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येईल असाच प्रश्न आता अनेकांनी उपस्थित केला आहे. पणवेळच याचं उत्तर देऊ शकेल. त्यामुळ आता तिच्या पदार्पणाचीच वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही हेही तितकच खरं. पणमांजरेकर आणि सलमानचं नातं पाहता एखाद्या तगड्या प्रोजेक्टमधून अश्वमी पदार्पण करु शकेत ही शक्यता नाकारता येत नाही.

No comments