Page Nav

HIDE

Breaking News:

latest

‘या’ दिवशी रिलीज होणार रजनीकांत यांच्या ‘पेटा’ चित्रपटाचा ट्रेलर

येत्या 28 डिसेंबरला सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी  ‘ पेटा ’  चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यांचा  2.0  चित्रपट नुकत...

येत्या 28 डिसेंबरला सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी पेटा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यांचा 2.0 चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. 

अभिनेता अक्षय कुमार देखील यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. रजनीकांतशिवाय पेटा’ चित्रपटात प्रसिद्ध कलाकार नवाजुद्दीन सिद्दीकी सुद्धा पाहायला मिळणार आहे. या दोन्ही कलाकारांना स्क्रीन शेअर करताना पाहणे त्यांच्या चाहत्यांसाठी अधिक खास असणार आहे.

या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांना काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाला. रजनीकांत यांनी यात आपला नेहमीप्रमाणेचा अंदाज दाखवून चाहत्यांवर भूरळ पाडली आहे. 
नवाजुद्दीन या चित्रपटात सिंगार सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. तो या चित्रपटातून तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. कार्तिक सुबाराज यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून पुढील वर्षी म्हणजेच 2019 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

No comments