Page Nav

HIDE

Breaking News:

latest

'माऊली’ सिनेमात सैयामी खेरचा गावरान अंदाज | सैयामीनं घेतले सिद्धार्थ जाधवकडून मराठीचे धडे

' मर्जिया '  चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाकेदार पदार्पण करणारी अभिनेत्री सैयामी खेर आता  ' माऊली '  चित्रपटाच्या माध्यमातून म...

'मर्जियाचित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाकेदार पदार्पण करणारी अभिनेत्री सैयामी खेर आता 'माऊलीचित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. 'माऊलीया चित्रपटसाठी सैयामीनं मराठीतील सुपरस्टार सिद्धार्थ जाधवकडून मराठीचे धडे घेतले आहेत.

या सिनेमात गावातल्या तरूणीची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी सैयामीने बरीच मेहनत घेतली आहे. सैयामी उत्तम मराठी बोलते. मात्र ही भूमिका साकारण्यासाठी तिला ग्रामीण लहेजा हवा होता आणि उच्चारही तसेच हवे होते. यासाठी सैयामीच्या मदतीसाठी धावून आला अभिनेता सिद्धार्थ जाधव. माऊली सिनेमात सिद्धार्थसुद्धा विशेष भूमिका साकारत आहे. त्यामुळे सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान सिद्धू आणि सैयामीची चांगलीच गट्टी जमली. दोघांनाही क्रीडा आणि भाषेत रस आहे आणि त्यामुळेच त्यांच्यात चांगली मैत्री निर्माण झाली.

जेव्हा जेव्हा सेटवर दोघांना मोकळा वेळ मिळाला त्यावेळी दोघं गप्पा मारता मारता भाषा आणि सिनेमातील गावरान उच्चाराच्या संवादावर अधिक काम करू लागले. सिद्धार्थने तिला यातील लहानसहान गोष्टी समजावून सांगितल्या आणि सैयामीनेही त्या समजावून घेत अंमलात आणल्या. सिद्धू-सैयामीची ही मेहनत ट्रेलरमॉध्ये पाहायला मिळतेय. सैयामी मराठी अभिनेत्री उषा किरण यांची नात आहे.सैयामीने तिच्या आजीचे बरेच चित्रपट पहिलेत. आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे अभिनेत्री तन्वी आझमी या सैयामीच्या आत्या आहेत आणि त्यांनी रितेशसोबत लय भारी मराठी सिनेमात काम केलं आहे. त्यामध्ये त्यांनी रितेशच्या आईची भूमिका वठवली होती. अभिनयाचा घरातून मिळालेला वारसासहकलाकारांची मदत आणि स्वतःची मेहनत यामुळे माऊली सिनेमातील सैयामीची भूमिका रसिकांना नक्कीच आवडेल.

No comments