Page Nav

HIDE

Breaking News:

latest

भारतीयांची अंतराळभरारी

स्वातंत्र्यप्राप्तीच्या  पंचाहत्तरव्या वर्षापूर्वी साध्य करावयाच्या  ' मिशन गगनयान '  या दहा हजार कोटी रुपये खर्चाच्या देशाच्या मानव...

स्वातंत्र्यप्राप्तीच्या पंचाहत्तरव्या वर्षापूर्वी साध्य करावयाच्या 'मिशन गगनयानया दहा हजार कोटी रुपये खर्चाच्या देशाच्या मानवी अवकाश मोहिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुक्रवारी मंजुरी देण्याात आली. या मोहिमेंतर्गत तीन भारतीय अवकाशवीरांचा सात दिवस अंतराळात मुक्काम असेल. निर्धारित लक्ष्यानुसार पुढील ४० महिन्यांमध्ये ही मोहीम पूर्णत्वाला गेल्यास मानवी अंतराळ मोहीम फत्ते करणारा भारत जगातला चौथा देश ठरेल.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाआधीसन २०२२ पर्यंत 'गगनयानमोहीम पूर्णत्वाला नेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केली होती. गुरुवारी रात्री झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मोहिमेला मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय विधी व न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

या मोहिमेसाठी भारतीय हवाईदल आणि इस्रो हे मिळून अंतराळवीरांची निवड करतील. या महत्त्वाकांक्षी मोहिमेत भारतीय अवकाश संशोधन संस्थेसह (इस्रो) विविध विद्यापीठेसरकारी व खासगी संशोधन संस्था तसेच खासगी उद्योगांचा सहभाग असेल. शिवाय रशिया आणि फ्रान्सचेही सहकार्य त्यास असेल. या मोहिमेसाठी अद्याप अंतराळवीरांची निवड करण्यात आलेली नाही.

No comments