Page Nav

HIDE

Breaking News:

latest

बघा कोण-कोण होत्या बॉलीवूडच्या भाईच्या 'जान'

करिअरच्या सुरुवातीला  सलमान   खानचे   सोमी अली- सोबत सूत जुळले होते. मात्र सलमानने तिला मारहाण केल्यामुळे त्यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा होत...

करिअरच्या सुरुवातीला सलमान खानचे सोमी अली-सोबत सूत जुळले होते. मात्र सलमानने तिला मारहाण केल्यामुळे त्यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा होती.

सलमान खानचे मिस इंडिया असलेल्या संगीता बिजलानी-सोबत प्रेमसंबंध होते मात्र कालांतराने त्यांच्यात वाद झाल्याने त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संगीताने क्रिकेटपटू अझरुद्दीन सोबत लग्न केलं.

“हम दिल दे चुके सनम” चित्रपटाच्या शूटींग दरम्यान सलमान व ऐश्वर्या राय एकमेकांच्या जवळ आले. मात्र सलमानचा तापट स्वभाव व त्याने केलेल्या मारहाणीमुळे ऐश्वर्याने त्याच्यासोबत ब्रेकअप केल्याचे समजते.

ऐश्वर्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर सलमानने तिच्यासारख्याच दिसणाऱ्या स्नेहा उल्लाल या तरुणीला त्याच्यासोबत लकी सिनेमातून संधी दिली. सलमान व स्नेहाच्या अफेअरच्या चर्चा त्यावेळी चांगल्याच रंगल्या होत्या.

'बूमसारख्या बी ग्रेड सिनेमात काम केलेल्या कतरिनाला सलमानने बॉलिवूडमध्ये संधी दिली. त्यानंतर अनेक वर्ष हे दोघे एकमेकांना डेट करत होते. मात्र 2010 मध्ये त्या दोघांचे ब्रेकअप झाले.

कतरिनासोबत ब्रेकअप झाल्यावर सलमानने तिच्यासारख्या दिसणाऱ्या झरीन खानला बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला. झरीन देखील काही काळ सलमानला डेट करत होती असे समजते.

सलमानसोबत 'जय हो' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या डेझी शाह हीला सलमानने लक्झरी कार गिफ्ट केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जात होते.

सलमान रोमानियाची अभिनेत्री लुलिया वंतूर हिला डेट करत असल्याची देखील चर्चा होती. अजुनही लुलिया ही सलमानच्या घरच्या प्रत्येक कार्यक्रमात दिसते. त्यामुळे सलमान लुलियासोबत लग्न करणार असे देखील म्हटले जाते.

No comments