Page Nav

HIDE

Breaking News:

latest

बंद झाला अक्षय कुमारचा ‘हा’ धमाकेदार चित्रपट?

बॉलिवूडचा  ‘ खिलाडी ’   अक्षय कुमार सध्या जोरात आहे. एकापाठोपाठ एक असे ब्लॉकबस्टर चित्रपट देण्याचा सपाटा त्याने लावलाय. त्याच्या नुकत्याच ये...

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या जोरात आहे. एकापाठोपाठ एक असे ब्लॉकबस्टर चित्रपट देण्याचा सपाटा त्याने लावलाय. त्याच्या नुकत्याच येऊन गेलेल्या पाच चित्रपटांची बॉक्स  ऑफिसवरची आकडेवारी बघितली तर अक्षय बॉलिवूडचा सर्वाधिक यशस्वी स्टार आहेहे कुणीही मानेल. अलीकडेच रिलीज झालेल्या अक्षयच्या ‘2.0’ ने तर आणखीच मोठी झेप घेतली आहे.

जगभरात या चित्रपटाने ६०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. पण याचदरम्यान अक्षयच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. होयअक्षयचा एक मोठा सिनेमा बंद झाला आहे. होयकाही दिवसांपूर्वी अक्षयने आपल्या सोशल अकाऊंटवर  क्रॅक या चित्रपटाची घोषणा केली होती. त्याने या चित्रपटाने पोस्टरही रिलीज केले होते. पण यानंतर नीरज पांडे दिग्दर्शित क्रॅक’ रखडला. अद्यापही या चित्रपटावर काम सुरु झालेले नाही. अशात अक्षयने हा चित्रपट सोडल्याची खबर आहे. खबर तर ही सुद्धा आहे कीक्रॅक आता कधीच सुरु होणार नाही.

सध्या अक्षयकडे एकापाठोपाठ एक असे ८ सिनेमे आहेत. या चित्रपटांना अक्षयने आधीच तारखा दिल्यात आहे. क्रॅकच्या घोषणेनंतर आलेल्या त्याच्या चित्रपटांचे शूटींगही सुरु झाले आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षे तरी क्रॅक सुरू होणे कठीण दिसत आहे. दोन वर्षांत चित्रपट सुरु होणार नसेल तर तो थंडबस्त्यात पडणे निश्चित मानले जात आहे.


No comments