Page Nav

HIDE

Breaking News:

latest

बघा रजनीकांतच्या ‘पेटा’ मधील नवाजुद्दीनचा फर्स्ट लूक

‘ पेटा ’   हा तमिळ चित्रपट असून यात नवाजुद्दीन सिंगार सिंगची भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून तो पहिल्यांदाच तमिळ चित्रपटसृष...

पेटा हा तमिळ चित्रपट असून यात नवाजुद्दीन सिंगार सिंगची भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून तो पहिल्यांदाच तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच २०१९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दर्जेदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. नवाजुद्दीने बॉलिवूडमध्ये आपला असा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सुरुवातीच्या काळात अगदी छोट्या भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याने अल्पावधीतच कलाकारांच्या गर्दीत स्वत:ला सिद्ध केलं. बॉलिवूडच्या यशानंतर आता तो दाक्षिणात्य चित्रपटाकडे वळला आहे. पेटा या आगामी चित्रपटात तो प्रमुख भूमिकेत झळकणार असून त्याच्यासोबत सुपरस्टार रजनीकांत स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटातील नवाजुद्दीनचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे.

चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी आणि प्रसिद्ध कलाकार म्हणून नवाजुद्दीनकडे पाहिलं जातं. तर दाक्षिणात्य चित्रपटाव्यतिरिक्त बॉलिवूडमध्ये स्वत:ची छाप पाडत प्रेक्षकांवर अभिनयाची भूरळ पाडणारा अभिनेता म्हणून रजनीकांत यांच्याकडे पाहिलं जातं. हे दोन्ही अभिनेता चित्रपट दिग्दर्शन कार्तिक सुबाराज यांच्या पेटा या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. त्यामुळे या दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट पर्वणीच ठरणार असल्याचं दिसून येतं.No comments